आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Love Marriage Couple Commits Suicide By Hanging

अधूरी एक कहाणी: एक महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह, दोघांनी केली आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नालंदा (बिहार)- दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम होते. दोघांनी प्रेमविवाह केला. सुखी संसार सुरु झाला. व्हॅलेंटाईन डेही अगदी काही दिवसांवर आला होता. त्याचीही तयारी होतीच. पण कुठे माशी शिंकली दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सुखी संसाराचे घरटे मांडले त्यातच आत्महत्या केली. तिही दोघांनी. या घटनेने बिहारमधील नालंदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रिती कुमारी (वय 20) आणि सनी कुमार (वय 25) असे आत्महत्या करणाऱ्या दांपत्याची नावे आहेत. एका महिन्यापूर्वीच दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघे या घरात राहायला आले होते. त्यांनी हे पाऊल का उचलले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. पोलिस तपास करीत आहेत.
दूधवाल्याकडून मिळाली माहिती
काल (शुक्रवार) सकाळी दूधवाला आला. त्याने बराच वेळ दार ठोकले. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने मोबाईलवरुन फोन केला. फोनची रिंग जात होती. पण कुणी फोन उचलत नव्हते. त्याला संशय आला. त्याने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनीही दार वाजवले. पण काहीच प्रतिसाद नाही. अखेर काही जण कौलारु छताच्या माध्यमातून घरात घुसले. त्यांनी बेडरुमची खिडकी उघडली. आत बघतात तर सगळेच सुन्न झाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशी गळफास घेऊन केली आत्महत्या.... बघा फोटो....