आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींच्या सभेत चेंगराचेंगरी, 2 महिलांचा मृत्यू झाला तरीही भाषण होते सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ: कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी त्यांच्या स्मारकावर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सभा घेतली. या रॅलीसाठी बसपा सुप्रिमोने संपूर्ण राज्यातून 2 लोख लोकांना बोलवण्याचे टार्गेट ठेवले होते. तर बसपा नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले की, लोकांची संख्या 5 लाखांपर्यंत पोहोचली. सभेच्या ठिकाणी लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे लोक मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जायाला लागले. मात्र सुरक्षारक्षकांनी गर्दीला आतच थांबवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि तेथे गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत गोरखपुर आणि कानपुरच्या गावातून आलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ८-१० जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या चेंगराचेंगरीत कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळूनसुध्दा मायावती यांचे भाषण सुरूच होते. एकमेकांवर पडायला लागले लोक...
- ही दुर्घटना कांशीराम स्मारकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर झाली, जेव्हा लोक अचानक गेटबाहेर जायला लागले.
- गेटजवळ उभ्या असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लाऊडस्पीकर बाहेरील बाजूस लावल्याने लोकांना मायावतींचा आवाज ऐकू येत नव्हता.
- यामुळे मुख्य प्रवेशव्दाराजवळ उभे असलेले लोक बाहेर जायायला लागले. सुरक्षारक्षकांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर काही पोलिसांनी गर्दीला आतच थांबवण्यासाठी लाठीमार केला. यामुळे लोकांमध्ये धावपळ सुरू झाली. या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला.
- गर्दीला आतच थांबवण्यासाठी काही लोकांनी तिथे विजेची तार तुटली असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी गेटच्या आतच थांबली.
- बुंदेलखंडवरुन आलेली एक महिला तिच्या बाळासह या गर्दीत दबल्यामुळे बेशुध्द आहे. तर लोकांनी बाळाच्या तोंडात हवा देऊन त्याला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्नही केले.
- जे बेशुध्द झाले आहेत, त्यांना शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कार्यकर्त्यांना बोलवण्यासाठी बुक केल्या होत्या 19 रेल्वेगाड्या
- सभेसाठी राज्यातून कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी बसपाने 19 रेल्वे आणि 210 बसगाड्या बुक केल्या होत्या.
- बुंदेलखंडवरून कार्यकर्त्यांना लखनौला आणण्यासाठी 2 रेल्वे बुक केल्या होत्या.
- माजी मंत्री नसीमुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्वांचलसाठी 2 रेल्वे देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बसून 50 हजार कार्यकर्ते लखनौला आले होते.
- पश्चिम उत्तरप्रदेशमधून कार्यकर्त्यांना बोलावण्यासाठी 15 रेल्वे बुक केल्या होत्या. यामध्ये जवळपास 1 लाख 60 हजार लोक सभेला आले.
पुढील स्लाईडवर पाहा, या सभेचे काही फोटो... असे जखमी झाले लोक... वेळेवर मिळाली नाही वैद्यकीय मदत....
बातम्या आणखी आहेत...