आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकराशे बेवारस, भाकड गायींपासून मिळते ३ कोटी रुपयांचे उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडवा गाव (हिसार) - बिहार निवडणुकीच्या प्रचारामध्ये गाय केंद्रस्थानी होती. नेत्यांच्या भाषणात त्याचा हमखास उल्लेख होत असे. धर्मग्रंथांमध्ये गोधन, कामधेनू, गोवर्धन, गोरक्षा, जननी अशी शब्दयोजना असली तरीही आज गायींना भाकड ठरवून कत्तलखान्यात सोपवले जाते. परंतु पंजाब-हरियाणाने भाकड आहेत म्हणून बेवारस सोडून दिलेल्या गायींचा सांभाळ करून त्यापासून वर्षाला ३. ५ कोटींचे उत्पन्न मिळवत व्यवसायाचा अनोखा मार्ग दाखवला आहे. हरियाणात लाडवा येथील लोकांनी बेवारस आणि भाकड गायींकडे शुद्ध व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले व त्यातून या गायी खऱ्या अर्थाने "गोधन' ठरल्या आहेत.
पंजाब-हरियाणात उच्च दर्जाच्या जर्सी गायींच्या माध्यमातून डेअरी व्यवसायाची १० हजार कोटींची उलाढाल होते. जर्सी गायी अशा प्रकारे भरभक्कम उत्पन्न देत असताना भाकड व बेवारस गायी सांभाळण्याचा लाडवाच्या ग्रामस्थांचा निर्णय कुणालाही वेडेपणाचा किंवा धाडसी वाटू शकला असता. कारण दूध देऊ शकत नसल्याने, तसेच अनेक आजार जडल्याने त्यांना बेवारस सोडून देण्यात आले होते. त्यामुळे त्या रस्त्यावर कुठेही भटकत असत. या सर्व गायी ग्रामस्थांनी गोशाळेमध्ये आणून त्यांच्यावर उपचार केले. त्या गायी दूध देत नसल्या तरीही गोशाळेचे वार्षिक उत्पन्न साडेतीन कोटी रुपयांच्या वर गेले आहे. कारण या गायींचे शेण व गोमूत्र गोळा करून त्याचा व्यवसाय गोशाळेने सुरू केला आहे.
गोशाळेचे प्रमुख आनंदराज सिंह यांनी सांगितले की, गायीकडे आस्था किंवा राजकारणाशी जोडून पाहिले तर त्यांची हीच अवस्था होईल. परंतु गोपालन हा शुद्ध व्यवसाय आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आम्ही शेणापासून बायोगॅस बनवतो. त्यातून निघणाऱ्या शेणाचे जैविक खत बनते, तर गाेमूत्रापासून कीटकनाशके व अर्क बनते. त्याचा विविध औषधांमध्ये वापर होतो. त्याचे योग्य विपणन करून आम्ही नफा कमावतो.
बेवारस गायींची गोशाळा
लाडवा येथील गोशाळेत एक गाय सरासरी १० किलो शेण व १० लिटर मूत्र देते. १० किलो शेणापासून ७ किलो खत बनते. ते ३५ रुपयांना विकले जाते. १० लिटर गोमूत्रापासून १० लिटर वेगवेगळी उत्पादने निघतात. ते शंभर रुपये लिटर याप्रमाणे विकले जातात. त्यामुळे गोशाळेला दररोज ११ लाखांचे उत्पन्न होते. चाऱ्यावर प्रत्येक गायीवर ५० रुपये खर्च येतो.
फायदा केवळ गोशाळेचाच नव्हे, शेतकरी-ग्राहकांनाही
मालवा बेल्टमध्ये ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या भागात शेतकरी पिकांवर कीटकनाशके फवारण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नापिकी वाढली आहे. कीटकनाशके पिकांमधून शरीरात जात आहेत. त्यामुळे जैविक शेती व उत्पादनाची मागणी इतकी वाढली आहे की त्याला मागेल ती किंमत मिळत आहे. जैविक खतांमुळे ही समस्या कमी होऊ शकते.