आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: शिक्षकांना वेतन नाही पण शासनातर्फे आमदारांना महागडे गिफ्ट, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार सरकार सध्‍या राज्‍यातील आमदारांसाठी चांगलेच पावले आहे. शुक्रवारी विधानसभेच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात आमदारांना एकाहून एक गिफ्ट देण्‍यात आले आहे. शासनाचा शिक्षण विभाग होळीच्‍या आधी शिक्षकांना वेतन देऊ शकला नाही, मात्र आमदारांना 30 लाख रूपयांचे मायक्रोव्‍हेव ओव्‍हन देऊ शकला. त्‍यामुळे शिक्षकांनी प्रशासनाविरोधात संताप व्‍यक्‍त केला. शुक्रवारी आमदारांना ओव्‍हन, सुटकेस, घड्याळी यासारखे महागळे गिफ्ट देण्‍यात आले. पशुपालन विभागाने वाटल्‍या ट्रॉली बॅग..
-विधानसभेच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात आमदारांना एकाहून एक गिफ्ट मिळाले.
- गुरुवारी मोबाइल मिळाल्‍यानंतर शुक्रवारी पशुपालन विभागाने ट्रॉली बॅगचे वाटप केले.
- शिक्षण विभागाने गोदरेज कंपनीचे मायक्रोवेव्ह ओव्हन भेट दिले.
- या सर्व भेटवस्‍तूंचे वाटप विधानभवनातच झाले.
- विधानसभेच्‍या बाहेर ओव्‍हनने भरलेला एक ट्रक उभा होता.
- विधानसभेचे एकूण 243 आमदार आणि विधान परिषदेच्‍या 75 आमदारांना या भेटवस्‍तू वितरीत करण्‍यात आल्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आमदारांना मिळाल्‍या या वस्‍तू..
बातम्या आणखी आहेत...