Home | National | Bihar | Mother Of Two Children Love Affair With Tuition Teacher

दोन मूलांची आई असलेल्‍या महिलेचे टयूशन टिचरवर प्रेम, आता करायचे आहे लग्‍न

दिव्‍य मराठी | Update - Dec 20, 2016, 01:06 PM IST

बिहारमध्‍ये भागलपुर येथे राहणाऱ्या एका महिलेच आपल्‍यापेक्षा अर्ध्या वयाने कमी असलेल्‍या एका युवकावर प्रेम जडल आहे

 • Mother Of Two Children Love Affair With Tuition Teacher
  भागलपूर (बिहार) - बिहारमध्‍ये भागलपूर येथे राहणाऱ्या एका महिलेचे आपल्‍यापेक्षा अर्ध्या वयाने लहान असलेल्‍या एका युवकावर प्रेम जडले. महिला विवाहित असून दोन मुलांची आई आहे. या महिलेचे नाव नीलू देवी आहे. या महिलेचे ज्‍या टयूशन टिचरवर प्रेम जडलेय, त्‍याचे नाव आशिष चौरसिया आहे. आशिष चौरसिया फक्‍त 19-20 वयाचा असून नीलू 38 वर्षांची आहे. तीन महिन्‍यापूर्वी दोघेही पळून गेले होते ....
  - नीलू देवी आणि आशिष चौरसिया तीन महिन्‍यांपूर्वी पळून गेले होते.
  - सोमवारी अचानक ते बबरगंज पोलिस स्‍थानकात हजर झाले.
  - आम्‍हाला लग्‍न करायचे आहे, असे त्‍यांनी पोलिसांना सांगितले.
  - परंतू पोलिसांनी लग्‍न लावून देण्‍यास नकार दिला. कारण नीलू देवी विवाहित होती आणि तिचा घटस्‍फोटदेखील झालेला नव्‍हता.
  - नीलू देवी आणि आशिष वेगवेगळया समाजाचे आहेत. त्‍यांना दोन्‍ही समाजातील लोकांच्‍या साक्षीने विवाह करायचा आहे.
  काय म्‍हणणे आहे महिलेच
  - आशिष मिळाला नाही तर मी विष खाईल अशी या महिलेने धमकी दिली आहे.
  - आशिषचे म्‍हणणे आहे की, मी नीलूला आपली पत्‍नी मानतो.
  - एकमेकांसोबत राहण्‍याची दोघांनाही तीव्र इच्‍छा आहे.

  टयूशन टिचरसाठी पती आणि मूलांना सोडले
  - महिलेने टयूशन टिचरसाठी आपल्‍या 55 वर्षीय पती बबलू मोदी आणि दोन मूलांना सोडले आहे.
  - नीलूचा एक मूलगा 10 वर्षाचा असून त्‍याचे नाव उज्ज्वल आहे. तर अनमोल या दुुसऱ्या मूलाचे वय 6 वर्ष आहे.
  - महिलेचा पती बबलू मोदीचे म्‍हणणे आहे की, तो दोन्‍ही मूलांना स्‍वत:सोबतच ठेवेल.
  - आशिष हा बबलू मोदीच्‍या मूलांची शिकवणी घ्‍यायला त्‍यांच्‍या घरी यायचा आणि त्‍याच दरम्‍यान त्‍यांच्‍यात प्रेम झाले असावे अशी शक्‍यता आता व्‍यक्‍त केली जात आहे.
  - कारण यानंतरच दोघेही घरातून फरार झाले होते.
  - दोघांचेही नातेवाईक आणि परिसरातील लोक या लग्‍नाच्‍या विरोधात आहेत. म्‍हणून नीलू आणि आशिषने बूढानाथ मंदीर येथे लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला आहे.
  पुढील स्‍लाइडवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटो....

 • Mother Of Two Children Love Affair With Tuition Teacher
 • Mother Of Two Children Love Affair With Tuition Teacher
 • Mother Of Two Children Love Affair With Tuition Teacher
 • Mother Of Two Children Love Affair With Tuition Teacher

Trending