Home »National »Bihar» New About Self Kidnap The Boy And Enjoy The Money

मुलाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 24, 2017, 03:15 AM IST

  • मुलाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
बेतिया (बिहार) -मौजमजा करण्यासाठी आणि दिल्ली फिरण्यासाठी ८ वीतील एका विद्यार्थ्यांने आपल्याच वर्गमित्रांना सांगून स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता आणि तो स्वत: दिल्लीला निघून गेला. त्यानंतर या दोन मुलांनी त्याच्या वडिलाकडे मोबाइलवर संपर्क साधून ७० लाखांची खंडणी मागितल्याची खळबळजनक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी मोबाइल ट्रॅकिंगवरुन या दाेन तरुणांना शोधून काढले. कथित अपहरण झाल्याचा बनाव करणाऱ्या मुलास पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक विनयकुमार यांनी एका पथकास दिल्लीला रवाना केले आहे.

मुफस्सिल पोलिस ठाण्याजवळ १५ दिवसापूर्वी एका १३ वर्षाच्या मुलाचे दोन कथित अपहरणकर्त्यांनी अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांना महत्वाचे धागेदाेरे हाती लागले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांना मंगळवारी विचारपूस केल्यानंतर रिमांड होममध्ये पाठवण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात ही माहिती दिली.
शिक्षकाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या दोघांना पकडले तेव्हा त्या मुलाचे हे दोघे मित्र असल्याचे समजले. या दोन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितले : त्याची दिल्लीला जाण्याची इच्छा होती. त्यामुळे तिघांनी मिळून ही योजना बनवली.
वडिलांचा मोबाइल नंबरही त्याने या मित्रांना दिला. मी काही दिवस गायब होतो असेही त्याने सांगितले. दरम्यान या मित्रांनी अपहरण केल्याचे सांगून पैसे उकळावेत . त्यानंतर ही रक्कम आपसात मिळून वाटून घेऊ, असेही ठरले होते. या योजनेप्रमाणे हा मुलगा पळून गेला. त्याच्या मित्रांनी वडिलांना फोन केला आणि खंडणी मागितली.
असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेतिया येथील मुफस्सिल ठाण्यांत महनागनीच्या एका शिक्षकाने तक्रार नोंदवली होती : त्यांचा १३ वर्षाचा मुलगा ८ फेब्रुवारी रोजी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला तो घरी परतलाच नाही. घटनेच्या एक दिवसानंतर त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने त्या शिक्षकास धमकावले : तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. ७० लाखांची खंडणी द्यावी, तरच त्याला सोडण्यात येईल. अन्यथा त्याला मारुन टाकण्यात येईल.

Next Article

Recommended