आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या आलिशान बसमधून प्रचार करतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक आलिशान बस विकत घेतले आहे. सध्या या बसची किंमत जाहीर करण्यात आली नाही. सध्या नितीशकुमार यांचा पक्ष जेडीयूनेही याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या आहेत सुविधा
या बसला DC Lounge Isuzu 4500WB नावाने ओळखले जाते. ऑटोमोबाईल डिझायनर दिलीप छाबडा यांनी ही बस डिझाईन केली आहे. ही बस पाटण्यात पोहोचली आहे. नितीशकुमार यांनी प्रचाराला सुरवात केलेली नाही. पण बसच्या किमतीवरुन उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

- या आलिशान बसला कधीही ऑफिसचा लुक देता येऊ शकतो. तिला चालत्या फिरत्या ऑफिसमध्येही बदलता येऊ शकते.
- यात चार सिट्स आहेत. त्यांना बेडच्या स्वरुपातही बदलता येऊ शकते.
- सिट्सच्या मागच्या भागाला बेडरुमही आहे. यात एक सॅटेलाईट फोनही आहे.
- बेडरुममध्ये टीव्ही आणि रेफ्रिजरेटरही आहे.
- बसचे प्रामुख्याने चार भाग होतात. त्यात ड्रायव्हर केबिन, लाऊंज एरिया, बेडरुम आणि वॉशरुम यांचा समावेश होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या बसचा अगदी हटके लूक...