आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Government Today Decided To Impose 13.5 Per Cent Tax On Luxury Items

लालूंच्‍या बिहारमध्‍ये आलू समोसा, कचोरी, मिठाईवर 13.5 टक्के टॅक्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्‍ये अतिरिक्‍त महसूल गोळा करण्‍यासाठी नितीशकुमार सरकारने लक्‍झरी साहित्‍यावर असलेल्‍या करांमध्‍ये वाढ केली आहे. त्‍यामुळे नवीन निर्णयानुसार सुमारे डझनभर वस्‍तूंवर 13.5 टक्‍के कर आकारण्‍यात येणार आहे. समोरा, कचोरी आणि मिठाईदेखिल या करवाढीतून सुटली नाही. नितीशकुमार यांच्‍या अध्‍यक्षतेत राज्‍य मंत्रीपरिषदेची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. कर वाढवण्‍याच्‍या प्रस्‍तावाला राज्‍य मंत्रीमंडळाने तत्‍काळ मंजुरीही दिली.
एक डझन वस्‍तूंवरील कर वाढला
- बिहार सरकारने एक डझन वस्‍तूंवरील टॅक्‍स वाढवण्‍यात आला आहे.
- मंगळवारी मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांच्‍या अध्‍यक्षतेत मंत्री परिषदेची बैठक झाली.
- त्‍यानंतर प्रधान सचिव बृजेश महरोत्रा यांनी 13.5 टक्‍के करवाढ झाल्‍याचे सांगितले.
खाद्यपदार्थ....
- खाद्यपदार्थांमध्‍ये समोसा, कचोरी, मिठाई, सर्व प्रकारचा सुका मेवा.
- बेसण व मैद्यापासून तयार झालेल्‍या पदार्थांचा कर वाढवण्‍यात आला आहे.
- आधी 500 रूपये किलोपेक्षा महाग मिठाई करमुक्‍त होत्‍या.
कपडे....
- 2000 रूपयांपेक्षा महाग साडीवर 5 टक्‍के कर आकारण्‍यात येणार आहे.
- 500 रूपये प्रति मीटरपेक्षा महाग कपड्यांवर कर आकारण्‍यात येईल.
इतर वस्‍तू....
- बांधकामासाठी वापरण्‍यात येणा-या वाळूवरील कर वाढवण्‍यात आला आहे.
- मच्‍छर अगरबत्‍ती, सौंदर्य प्रसाधने, दुचाकीचे पार्ट, बॅटरी या वस्‍तूंवरील कर वाढले आहेत.
- औद्योगिक केबल, ट्रांसफॉर्मर, फोमपासून बनलेले शीट या वस्‍तूंवर 13.5 टक्‍के कर आकारला जाईल.