आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patna City Sp Lande Caught Up Inspector In Bribe Case

लाच घेण्यासाठी यूपीचा इन्स्पेक्टर बिहारात, एसपी लांडे यांनी वेष बदलून पकडले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- पाटण्यात रविवारी पोलिसांनी एक मजेदार कारवाई केली. तपासणीच्या नावाखाली यूपीच्या मुरादाबादहून आलेला इन्स्पेक्टर स्वत: चौकशीच्या फे-यात अडकला. पाटण्यात सीम विकणा-या पंकजकडून 5 हजारांची लाच घेण्यासाठी हा इन्स्पेक्टर आल्याचा आरोप आहे. पंकज यानेच पोलिसांना ही माहिती दिली.
ज्या ठाण्याने सर्वचंद्र यांची राहण्याची व्यवस्था केली त्याच भागाचे एसपी शिवदीप लांडे यांनी त्याला पकडले. अतिरेक्यांना सीम विकत असल्याच्या आरोपाखाली यूपी पोलिस त्रास देत असल्याचा पंकजचा आरोप होता. ही कारवाई करणारे एसपी लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारसचे आहेत.
मराठमोळ्या शिवदीप लांडेंनी बखोट धरताच सोबती पळाले-
पंकज शनिवारी रात्री 9 वाजता सर्वचंद्र यांना पैसे देणार होता. पण पंकजने रविवारी सकाळी ठरल्या ठिकाणी बोलावले. रात्रीच पोलिसांना माहिती देऊन ठेवली. एसपी शिवदीप लांडे निळी जीन्स व लाल टी-शर्टमध्ये पहाटेच ठरल्या जागी पोहोचले. सर्वचंद्र ७ वाजता आला. सीसीटीव्हीकडे लक्ष जाताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याच्या बेतात असतानाच लांडे यांनी बखोट पकडून त्याला गाडीत बसवले. सर्वचंद्रच्या सोबत आलेले चार कॉन्स्टेबल मात्र हा सगळा प्रकार पाहून पळून गेले.
दोन तास कसून चौकशी, मगच सोडले
एफआयआर नोंदवला नसला तरी दोन तास चौकशी करून सोडले. पथकाशी गैरवर्तन झाल्याचा यूपी पोलिसांचा आरोप आहे.