पाटणा- येथील रवींद्र भवनमध्ये बेलदार समाजाच्या संमेलनादरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने माजी मंत्री आनंदमोहन सिंह यांचे निधन झाले. लालूप्रसाद यादव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू होता. संमेलनातील व्हिआयपी लोकांची वाहने येथे मोठ्या प्रमाणात उभी होती. मात्र या घटनेनंतर कोणीही आनंदमोहन यांना रूग्नालयात हलवण्याचे कष्ट घेतले नाही. एका कार्यकर्त्यांने त्यांना रूग्नालयात हलवले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लालूंचे भाषण सुरूच होते
बेलदार संमेलनात लालू यादव आणि राज्य सरकारचे मंत्री मंत्री श्याम रजक उपस्थित होते. आधी आनंदमोहन भाषण देऊन जागेवर बसले. काही वेळाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कार्यकर्त्यांनी त्यांना हॉलमध्ये नेले. त्यांना चक्कर आली असल्याचे यावेळी मंचावरून सांगण्यात आले. अशावेळी लालू यादव यांचे भाषण सुरूच होते. मंत्री श्याम रजक यांनी हळू आवाजात सिंह यांच्या निधनाची बातमी दिली. नंतर लालू यादव यांनी उपस्थितांना मौन श्रद्धांजलीचे आवाहन केले. त्यानंतर कार्यक्रम थांबवण्यात आला. या कार्यक्रमात व्हिआयपी लोकांची उपस्थिती होती. तरीही रूग्नवाहिकेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे आनंद मोहन यांना तत्काळ उपचार मिळू शकले नाही.
आनंदमोहन यांना रायकीय वारसा
रोहतास जिल्ह्यातील अकाशी या गावात राहणारे आनंद मोहन यांना राजकीय वारसा होता. त्यांचे वडील जंगी चौधरी समाजवादी नेते होते. 1990 मध्ये लालू यादव यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. वडिलांच्या निधनानंतर आनंद मोहन यांनी 1995 मध्ये विधानसभा निवडणूक लढली. त्यानंतर ते राज्यमंत्रीही झाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, आणखी एक फोटो..