आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RJD चे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेप, 22 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात दोषी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारीबाग(झारखंड): राष्ट्रीय जनता दलचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांनी MLA अशोक सिंह यांची हत्या केल्याप्रकरणी हजारीबागच्या  कोर्टाने मंगळवारी प्रभुनाथ सिहांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अशोक सिंह यांचा खून 1995 मध्ये झाला होता. प्रभुनाथ यांना 18 मे ला कोर्टाने दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना कारागृहामध्ये रवाना केले. 
लालूंचे निकटवर्तीय आहेत प्रभुनाथ सिंह...

- या प्रकरणात प्रभुनाथ सिंह यांचे बंधू दीनानाथ सिंह आणि पुतण्या रितेश सिंह यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.  त्यांच्यावर 40-40  हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
- अशोक सिंह सारण जिल्ह्यातील मशरकमधून जनता दलाचे आमदार होते. 1995 मध्ये त्यांची हत्या सरकारी निवास्थानी करण्यात आली होती.  
- या प्रकरणाची कारवाई झारखंडच्या हजारीबाग येथील कोर्टात झाली. प्रभुनाथ सिवान जिल्ह्याचे आहे आणि महाराजगंजचे खासदार राहिलेले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...