आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारला घातले खड्ड्यात, PM मोदींनी साधला लालू, नितीश सोनियांवर नेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्‍ये चौथ्‍या टप्‍प्यातील मतदान सुरू आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी प्रचारासाठी मधुबनी येथे पोहोचले. भाजपाच्‍या प्रचार मेळाव्‍यात बोलताना मोदी यांनी सुरूवातीलाच लालू-नीतीश आणि सोनिया गांधी यांच्‍यावर नेम साधला. नीतीश आणि लालूंना उद्देशून पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, ''माझा तंत्र-मंत्रावर नाही, तर लोकशाहीवर विश्‍वास आहे. हे लोक जेव्‍हा नाराज होतात तेव्‍हा बुवा बाबांजवळ जातात. या लोकांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. तुम्‍हाला जंतर-मंतर पाहिजे की, विकास ? असा प्रश्‍न विचारत मोदी यांनी लोकांची मते घेतली.
बिहार फुल फॉर्म सांगितला
मोदी यांनी बिहारची स्‍तुती करत BIHAR या इंग्रजी नावातील प्रत्‍येक अक्षराचे महत्‍त्‍व सांगितले. ते म्‍हणाले B म्‍हणजे ब्रिलियंट, I म्‍हणजे इनोव्‍हेटीव्‍ह, H म्‍हणजे हार्ड वर्किंग, A म्‍हणजे अॅक्‍शन ओरिएंटेड आणि R म्‍हणजे, रिसोर्सफुल.'' काही दिवसांपूर्वी नीतीश यांचा एक व्‍हिडीओ समोर आला होता त्‍यामध्‍ये ते एका बाबासोबत दिसले होते. त्‍यामुळे भाजपाने त्‍यांच्‍यावर नेम साधला आहे.
पीएम मोदी आणखी काय म्‍हणाले ?
>बिहारच्‍या लोकांचे भाग्‍य बदलण्‍यासाठी त्रिसुत्री कार्यक्रम आहे. शिक्षण, उत्पन्न आणि औषध.
बिहारच्‍या तरूणांचे स्‍थलांतर थांबले पाहिजे. येथील लोकांना रोजगार मिळायला हवा.
>तुमच्‍या परिवारात कोणी आजारी असले उपचारासाठी तंत्र-मंत्रांवर विश्‍वास ठेवतात. नीतीशही अशाच तंत्र मंत्राला शरण जात आहेत. नीतीश यांना विकासापेक्षा, जादू टोना वाढवायचा आहे.
> पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्‍यावरही जोरदार टीका केली आहे. लालू यांनी महिलांना अशिक्षित ठेवले असे ते म्‍हणाले.
> माझ्यासाठी BIHAR असा आहे..
B - म्‍हणजे ब्रिलियंट, I - म्‍हणजे इनोव्‍हेटिव्‍ह, H - म्‍हणजे हार्ड वर्किंग, A- म्‍हणजे अॅक्शन ओरिएंटेड आणि R -म्‍हणजे रिसोर्सफुल.

>लालू-नीतीश यांनी मिळून बिहारला खंड्ड्यांमध्‍ये पुरले आहे. एका इंजिनाने बिहारचा विकास होणार नाही. त्‍यासाठी दोन इंजिन हवे. एक बिहारमध्‍ये दुसरे दिल्‍लीत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा काय म्‍हणाले मोदी, पाहा संबंधित फोटो..