आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 व्या वर्षी झाले होते राबडी देवीचे लग्न, 17 व्या वर्षी झाली पाठवणी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमध्ये तीस-या पायरीच्या मतदानाची तयारी सुरु झाली आहे. 28 अक्टोबरला 50 जागांसाठी मतदान होणार आहे. आज आम्ही सांगणार आहोत राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी विषयी...

पटना - लालू प्रसाद यादवलाचे कुटूंब बिहारमधील पहिले राजकीय कुंटूब आहे. लालू इथपर्यंत खुप कष्ट करुन पोहोचले. निवडणुकीत ते राजकारणाच्या अगोदर कुंटूंबातील पद वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लालूंच्या लग्नाच्या वेळी राबडी देवी 14 वर्षांची होती. लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांची पाठवणी झाली.

1959 साली गोपाल गंजमध्ये जन्मलेली राबडी देवी आणि लालू प्रसाद यादवचे लग्न 1973 मध्ये झाले. राबडी देवी तेव्हा 14 वर्षांची होती तर लालूप्रसाद 25 वर्षांचे होते. त्या काळात लग्न लवकर केले जात होते. राबडीदेवीने एका मुलाखतीत सांगितले की, लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्याची पाठवणी झाली त्याकाळात देशात आणीबाणी चालु होती. लालू प्रसाद यादव त्यावेळी पटनामध्ये विद्यार्थी नेता होते. इमरजेंसीच्या विरुध्द विद्यार्थी अंदोलनाच्या वेळी लालूंना 1974 ते 1977 मध्ये अनेक वेळा अटक झाली आणि तुरुंगात जावे लागले. राबडी देवी सांगतात की, जेव्हा पासुन लग्न झाले आहे तेव्हा पासुन मी असे दिवस पाहत आहे. लालूजींना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले आहे. जेव्हा जेपी आंदोलनाच्या काळात लालू तरुंगात गेले. तेव्हा मुलं विचारत बाबा कधी येणार तर मला उत्तर देता येत नव्हते.

नेहमी देतात गुलाबाचे फूल
लालू प्रसाद यादव प्रत्येक आनंदाच्या क्षणी गुलाबाचे फूल देतात. मग त्यांचा वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस. अशाच प्रकारे ते छठ पूजेच्या वेळी उत्साही असतात. लालू प्रसाद यादव कोठेही असले तरी, राबडी देवीचा करबाचौथचा उपवास सोडवण्यासाठी वेळेवर अवश्य येतात.

राबडी देवीच्या सल्ल्याशिवाय कोणतेच काम करत नाही लालू
बोलले जाते की, लालू प्रसाद यादव पत्नी राबडीदेवीच्या सल्ल्याशिवाय कोणतेच काम करत नाही. अनेक वेळा त्यांना राबडीदेवीच्या जिद्दी खातर मागार घ्यावी लागली आहे. बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा मुलगा तेजप्रतापजचा प्रवेशही त्यांच्या कारणामुळेच झाला आहे. लालू लहान मुलाला राजकारणात उतरवु इच्छित होते परंतु राबडी देवीने तेजप्रतापला राजकारणात उतरवले.

25 जुलै 1997 मधये पहिल्यांना मुख्यमंत्री
जुलै 1997 मध्ये सीबीआयव्दारे चारा घोटाळ्यात लालू प्रसाद विरुध्द आरोपपत्र दाखल झाले. यानंतर लालू प्रसादने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. याच महिण्यात राबडीने बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2000 मध्ये आरजेडीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. राबडी देवी पुन्हा मुख्यमंत्री बनली. बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात पहिल्यांदा तरुंगात गेले होते. तरुंगात जाण्याअगोदर लालूने पत्नी राबडी देवीकडे बिहारची जबाबदारी सोपवली. राबडी देवी स्वतःला आणि मुलांना सांभाळत होती. यासोबतच पक्षाला एकत्र ठेवण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्यावर होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा असेच काही फोटोज...