आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Vilas Pashwan News In Marathi, BJP, Narendra Modi

बिहारमध्ये 7 जागा पदरात पाडून 12 वर्षानंतर भाजपचे झाले रामविलास पासवान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- दलित नेते रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी आणि भारतीय जनता पक्षाची आघाडी अखेर घोषित करण्यात आली. दिवसभर चाललेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर काल (गुरुवार) रात्री दहाच्या सुमारास भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी या आघाडीची घोषणा करण्यात आली. बिहारमधील जागा पाटपाचा निर्णयही या आघाडीने घेतला आहे. पासवान यांना 7 जागा मिळणार असून भाजप 30 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित तीन जागांवर उपेंद्र कुशवाहा यांच्या रालोसपा यांना देण्यात आल्या आहेत.
12 वर्षांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करीत रामविलास पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला होता. परंतु, आता पुन्हा रालोआत आल्यावर पासवान म्हणाले, की मी यापूर्वीही रालोआत होतो. तेव्हा यात 18 पक्ष होते. गेल्या काही वर्षांत यातील काही पक्षांनी रालोआला सोडचिठ्ठी दिली. परंतु, आनंदाची बाब ही आहे, की आता पुन्हा यातील पक्ष परत येत आहेत. यावेळी आम्ही मोदींना पंतप्रधान करणार आहोत.
काल सकाळी भाजपचे नेते रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाझ हुसैन यांनी रामविलास पासवान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेनंतर रविशंकर प्रसाद म्हणाले, की चांगली चर्चा झाली आहे. आम्ही मिठाई खाल्ली आहे.
परिस्थिती अनुकूल असली तरी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या धुरंधरांना तब्बल 10 तास लागले. त्यानंतर रात्री आघाडीची घोषणा करण्यात आली.
पुढे वाचा रामविलास पासवान का परतले रालोआत, निवडणूक विश्लेषण...