आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरण: फरार आमदार राजवल्लभ यादव यांची मालमत्ता जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवादा- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले राष्ट्रीय जनता दलाचे फरार आमदार राजवल्लभ यादव यांची मालमत्ता पोलिसांनी रविवारी जप्त केली.
यादव यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाकडून शनिवारी पोलिसांना मिळाले होते. नालंदा आणि नवादाचे पोलिस रविवारी यादव यांच्या इंग्लिश पाथ्रा या गावी गेले आणि त्यांची मालमत्ता जप्त केली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. यादव यांच्या घरातील सामान एका ट्रकमध्ये भरून ते नालंदाला येथे पाठवण्यात आले. तर दुसऱ्या ट्रकमध्ये सामान भरणे सुरू होते.

यादव यांनी ६ फेब्रुवारी रोजी पाथ्रा या गावातील आपल्या घरी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी ९ फेब्रुवारीला तक्रार दाखल केल्यापासून यादव फरार आहेत. न्यायालयाने २२ फेब्रुवारीला यादव यांची मालमत्ता जप्त करण्यास महिनाभरासाठी स्थगिती दिली होती आणि यादव यांना शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. शरण न आल्यास मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. दरम्यान, नवादाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी यादव यांचा शस्त्र परवाना निलंबित केला. त्यांच्याकडे एक रायफल, पिस्तूल आणि डबल बॅरलची बंदूक अशी तीन शस्त्रे आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुलीने काय केले आरोप..