आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salt Sells At Rs. 150 A Kg; Bihar Government Denies Shortage, Appeals For Calm

अबब!!! बिहारमध्ये मीठ 150 रुपये किलो, मंत्री म्हणाले यामागे \"आरएसएस\"चे षडयंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- येत्या काही दिवसांमध्ये मिठाचा तुटवडा जाणवणार असल्याच्या अफवा पसरल्याने बिहारमधील जवळपास सर्वंच जिल्ह्यांमध्ये मीठ प्रतिकिलो 150 रुपयांनी विकले जात आहे. दरम्यान, मिठाचा तुटवडा जाणवणार नसल्याचे बिहार सरकारने सांगितले असले तरी किराणामालाच्या दुकानांबाहेर मीठ घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहेत.
यासंदर्भात बिहारचे अन्न व नागरी पुरवठामंत्री श्याम रझाक म्हणाले, की येत्या काही दिवसात मिठाचा जबरदस्त तुटवडा जाणवणार असल्याच्या अफवा आहेत. लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये. राज्यात आवश्यक प्रमाणात मीठ उपलब्ध आहे. आम्ही लोकांना आव्हान करतो, की त्यांना काळाबाजारातून मीठ घेऊ नये. व्यापारी सर्वसामान्य जनतेला चारपट, पाचपट दराने मीठ विकत आहेत.
बिहारमधील ग्रामिण भागात ही अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या अफवांचा व्यापारी फायदा उचलत असल्याचे दिसून येत आहे.
मिठाच्या किमती वाढण्यामागे आरएसएसचा हात, म्हणाले श्याम रझाक, वाचा पुढील स्लाईडवर