आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyamev Jayate 2: Aamir Khan Visits Mountain Man Dashrath Manjhi\'s Village

माउंटनमॅनच्या प्रेमाचे प्रतीक ताजहून श्रेष्ठ -आमिर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया - ज्या जिगरबाज गिर्यारोहकाने केवळ छन्नी आणि हातोडीच्या मदतीने 360 फूट रस्ता तयार केला तो माउंटनमॅन दशरथ मांझी याचे स्मारक बनलेले गहलोर खोरे शहाजहानच्या भव्यदिव्य ताजमहालापेक्षा श्रेष्ठ आहे, अशी भावना अभिनेता आमिर खान याने मंगळवारी व्यक्त केली.

मांझी यांची जिद्द आणि चिकाटीवर आधारित शोच्या माध्यमातून समाजात जागरुकता निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही आमिर म्हणाला. ‘सत्यमेव जयते-2’च्या चित्रीकरणासाठी आमिर इथे आला होता. मात्र, आपल्या शोविषयी बोलण्याऐवजी त्याचे लक्ष पूर्णपणे मांझी यांच्या जिद्दीवरच केंद्रित होते.

दोन वर्षांपासून दशरथ मांझी यांचे जीवन आणि व्यक्तिमत्त्वाचा आपण अभ्यास केल्याचे सांगून सामान्य माणसाने ठरवले तर जगात काहीच अशक्य नाही, हा धडा यातूनमिळतो, असे आमीर म्हणाला. या आठवड्यात ‘सत्यमेव जयते’चा चमू मांझी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगून त्यांना हवी ती मदत केली जाणार असल्याचे तो म्हणाला.

मांझी यांना श्रद्धांजली : गहलोरला येताच मांझी यांच्या समाधिस्थळी आमिर गेला. पुष्पांजली अर्पण केल्यावर शेजारी छोट्या स्टुडिओमध्ये त्याने मांझी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी आमिरला पाहण्यासाठी हजारो लोक आले होते.

जेवणाबद्दल खंत
मांझींच्या कुटुंबीयांनी आमिरसाठी खास जेवण ठेवले होते. मात्र, प्रचंड गर्दी आणि व्यग्रतेमुळे तो मांझी यांच्या घरी जाऊ शकला नाही.

डोंगर कोरून केला होता रस्ता
माउंटनमॅन म्हणून ओळखले जाणारे मांझी यांनी केवळ हातोडी आणि छन्नीचा वापर करून आपल्या गावाजवळ असलेला डोंगर पोखरला. अहोरात्र काम करून त्यांनी 360 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 30 फूट उंच मार्ग तयार केला होता. आजही त्यांच्या या जिद्द व चिकाटीचा लोक अभिमानाने उल्लेख करतात.