आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाबुद्दीनला जन्‍मठेप, 2 भावांची अॅसिड हल्‍ल्यातून हत्‍या, तिस-या साक्षीदाराचाही खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार शहाबुद्दीन याला विशेष न्‍यायालयाने शुक्रवारी दोन तरूणांच्‍या हत्‍येप्रकरणी जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अॅसिड हल्‍ला करून त्‍याने या हत्‍या केल्‍या आहेत. शहाबुद्दीन आणि त्‍याच्‍या चार साथीदारांना बुधवारी दोषी ठरवण्‍यात आले होते. 2004 मध्‍ये हत्‍याकांड घडले तेव्‍हा शहाबुद्दीन रेकॉर्डवर तुरुंगात बंद असल्‍याचे सांगण्‍यात आले होते. मात्र तुरुंग प्रशासनाने खोटी माहिती दिल्‍याचे न्‍यायालयाने म्‍हटले आहे.
मृत मुलांचे वडिल म्‍हणाले- कोर्टाने फाशी का दिली नाही ?
शहाबुद्दीनला शिक्षा झाल्‍यानंतर मृत दोन्‍ही मुलांच्‍या वडिलांनी प्रतिक्रीया दिली, ते म्‍हणाले, “शहाबुद्दीनला जी शिक्षा मिळाली ती कमी आहे. त्‍याला फाशीची शिक्षा मिळायला हवी होती. मला नि माझ्या मुलांना आजही शहाबुद्दीनपासून धोका आहे. तो आमचाही खून करू शकतो. त्‍यामुळे शासनाने आम्‍हाला मदत करायला हवी.
साक्षीदार तिस-या भावाचीही हत्‍या
या हत्‍या प्रकरणात सर्वात महत्‍त्‍वाचा साक्षीदार असलेला राजीव यालाही मारण्‍यात आले आहे. अॅसिड हल्‍ल्यातील मृत दोघांचा राजीव भाऊ होता. त्‍याने 2010 मध्‍ये कोर्टात सांगितले होते की, गिरीश आणि सतीश यांच्‍यासोबत त्‍यांनी माझेही अपहरण केले होते. मात्र तो निसटण्‍यात यशस्‍वी ठरला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा,
- शहाबुद्दीनचे वकील म्‍हणाले - हायकोर्टात अपील करणार?
- काय आहे प्रकरण?
- निर्णयाचा असा अर्थ?