आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Attack On Ara Civil Court In Bihar, Woman And Police Personal Killed

बिहारमधील आरा सिव्हिल कोर्टात आत्मघातकी बॉम्बस्फोट, महिलेसह पोलिस ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- बॉम्बस्फोटानंतर कोर्टाच्या आवारात ठेवण्यात आलेला मृतदेह.) - Divya Marathi
(फोटो- बॉम्बस्फोटानंतर कोर्टाच्या आवारात ठेवण्यात आलेला मृतदेह.)
पटणा (बिहार)- आरा येथील सिव्हिल कोर्टात एका महिलेने आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. यात तिच्यासह एक अमित नावाचा पोलिस जागीच मृत्युमुखी पडला असून 15 जण जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असून जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते.
बिहारचे पोलिस उपमहानिरिक्षक अनिल कुमार यांनी सांगितले आहे, की ही महिला बॉम्ब घेऊन जात होती. बॉम्बचा अचानक स्फोट झाला. यात तिच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. कोर्टाच्या परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सिरिअल ब्लास्टची शक्यता गृहित धरुन सर्वांना सावध राहण्याचा संदेश देण्यात आला आहे.
या आत्मघातकी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे कोर्टाच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आत्मघातकी स्फोट करणाऱ्या महिलेचा मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बिहारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, आत्मघातकी बॉम्बस्फोट झाल्यानंतर असे पसरले भीतीचे वातावरण...