Home »National »Chhatisgarh» 42 Villages People Elephant Fixed Spends The Whole Night

42 गावचे लोक हत्तीच्या कळपामुळे दहशतीखाली घालवतात अख्खी रात्र

सध्या छत्तीसगडच्या महासमुंदच्या सिरपूर भागात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने लोक धास्तावले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांकडून लोकांची या दहशतीतून सुटका करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. एकीकडे लोकांचे बळी जात असल्याचे पाहून लोकांनीच आता स्वत:च्या सुरक्षेची तयारी केली आहे.

देवेंद्र गोस्वामी | Jan 21, 2017, 06:44 AM IST

  • 42 गावचे लोक हत्तीच्या कळपामुळे दहशतीखाली घालवतात अख्खी रात्र
रायपूर (छत्तीसगड) -सध्या छत्तीसगडच्या महासमुंदच्या सिरपूर भागात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने लोक धास्तावले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांकडून लोकांची या दहशतीतून सुटका करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. एकीकडे लोकांचे बळी जात असल्याचे पाहून लोकांनीच आता स्वत:च्या सुरक्षेची तयारी केली आहे. गावकरी मचाण आणि मशालीच्या साहाय्याने हत्तींना पळवून लावत आहेत. रात्रीच्या वेळी सर्वजण गस्त घालतात. वेळी -अवेळी हत्तीचा कळप गावात येत असल्याने लाेक धास्तावले अाहेत.

दररोज रात्री असे घडते
या गावात प्रत्येक रात्री अशीच परिस्थिती असते. हत्ती फिरकले नाहीत तरीही गावकऱ्यांना हत्तीचा कळप कधीही येऊन धडकेल याची खात्री देता येत नाही. पहिल्यांदा २० जुलै २०१६ रोजी एक हत्ती दिसला होता. त्यानंतर त्यांची संख्या वाढत गेली. धानाच्या पिकाचे नुकसान करू लागला. त्या वेळी ११ हत्ती दिसून येत होते. वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही वन्य प्राणितज्ज्ञ डॉ. रुद्रादित्य यांना बोलावण्यात आले. बंगालमधून २२ लोकांची हुल्ला पार्टी बोलावण्यात आली. ते हत्तींना पळवून लावण्यात प्रशिक्षित होते.

ओडिशा आणि झारखंडमधून आले
वन विभागाने बारनावापारामध्ये १४ हत्तींचा कळप असल्याचे सांगितले, परंतु महासमुंद जिल्ह्याचे वनपाल आलोक तिवारी यांनी सांगितले की, आमच्याकडे ओडिशा आणि झारखंडमधून हत्ती येत आहेत. यामुळे राज्यातील जंगलात हत्तींची संख्या जास्त आहे. हत्ती तेथील प्रदेश सोडून छत्तीसगडमध्ये येत आहेत.

संपूर्ण रात्र गस्त घालण्यात जाते
महासमुंदपासून २४ किमी दूर अंतरावरील लहंगर गावात सायंकाळी ५.२० च्या सुमारास गावातील मंदिरातून घोषणा झाली : नोहरा नाल्याजवळ हत्ती दिसले. सर्व शेतकऱ्यांनी मशाली आणि टॉर्च घेऊन एकत्रित जमावे. सर्वजण मंदिराजवळ जमले. थोड्याच वेळात वन विभागाची जीप आली. त्यामध्ये वनपालासह चार कर्मचारी होते.
गावकऱ्यांकडे मशाली आणि टॉर्च होत्या. त्यानंतर हत्तींचा शोध घेण्यात आला. सर्वांनी मिळून हत्तींना पिटाळून लावले. काही वेळाने ते पुन्हा परत आले. पुन्हा त्यांना पिटाळण्यात आले. रात्रभर असा खेळ चालू होता.

Next Article

Recommended