आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूमध्ये संस्कृत भाषेलाच प्राधान्य; भाषा विभागांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या संस्कृत भाषेला अधिक प्राधान्य देण्यात येत अाहे. जेएनयूमधील इतर भाषा विभागांच्या अध्यक्षांकडून अापापल्या राज्याच्या भाषेचा विकास हाेण्यासाठी त्या-त्या भाषेला सन्मान दिला जाताे. त्यासाठी माेठ्या संघर्षानंतर काही सुविधा व निधी मिळवण्यात ते यशस्वी ठरले असतानाच संस्कृत भाषेला प्रमाणापेक्षा जास्त दिल्या जाणाऱ्या महत्त्वामुळे नाराजी व्यक्त हाेत अाहे.  


जेएनयूमध्ये इतर भाषांच्या तुलनेत संस्कृतला अधिक महत्त्व देण्यात येत असल्याचे दिसून येते. गतवर्षी शैक्षणिक परिषदेने संस्कृत भाषेच्या अभ्यास केंद्रात संस्कृतसह इंडिकच्या अभ्यासाचे एक वेगळे केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली हाेती; परंतु इतर भाषा विभागांच्या अध्यक्षांनी याला अाक्षेप घेतला हाेता. संस्कृतप्रमाणेच इतर भाषांनाही मातृभाषेसारखा मान मिळावा. उडिया भाषा विभागाचे अध्यक्ष उदयनाथ साहू यांनी सांगितले की, माेठ्या संघर्षानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये उडिया भाषेसाठी वेगळा विभाग व कार्यालय मिळाले. अाेडिशा सरकारकडून पाच काेटींचे अनुदान मंजूूर केले. 


तयारी नसल्यास दुसऱ्या विभागाची घाई नकाे  
याबाबत बाेलताना बिलिमले यांनी कन्नड भाषेत एम.फिल. वा पीएच.डी.साठी अजूनही हव्या त्या सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. कुठल्याही प्रकारची तयार नसताना दुसरा विभाग सुरू करण्याची घाई करू नये. अाम्ही येथे अामचे काम करत असून, विद्यापीठाकडून अाम्हाला खूप अपेक्षा अाहेत. संस्कृतला महत्त्व देणे चुकीचे नाही; परंतु असे करताना इतर भाषांकडे दुर्लक्ष हाेता कामा नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. याशिवाय संस्कृतच्या विकासासाठी प्रयत्न हाेत असल्याचे पाहून अानंद वाटताे; परंतु असे करताना इतर भाषांचाही विचार केला जावा, असे मत तामिळ भाषा विभागाचे प्रमुख अार.दामाेदरन यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...