आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brother Killed Sister As She Cremated Mother Against His Wish

अत्यसंस्कार करुन मुलीने पूर्ण केली आईची अंतिम इच्छा, तर संतापलेल्या भावाने केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- आईची इच्छा होती मुलीने अंत्यसंस्कार करावा. आईच्या मृत्यूनंतर मुलीने आईची अंतिम इच्छा पूर्ण केली. पण यामुळे भाऊ संतापला. त्याने कुऱ्हाडीने वार करुन बहिणीची हत्या केली. पोलिसांनी भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिल्दा-नेवरा येथील रहिवासी सुरजबाई यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्या मुलगी गीतासोबत राहत होत्या. मृत्यूपूर्वी सुरजबाई यांनी माझ्या मृतदेहावर गीताने अंत्यसंस्कार करावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार गीताने सुरजबाई यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
सुरजबाईला तेजराम नावाचा मुलगा आहे. आईवर बहिणीने अंत्यसंस्कार केल्याचा त्याला फार राग आला. तो लगेच तिल्दा-नेवरा येथे आला. त्याने गीतावर कुऱ्हाडीने वार केले. यात गीता जागीच ठार झाली.
तेजराम आणि सुरजबाई यांच्यात वाद होता. तेजरामने सुरजबाईला घरुन बाहेर काढले होते. तेव्हापासून ती गीतासोबत राहत होती.
पुढील स्लाईडवर बघा, गीताने असा केला होता सुरजबाईवर अंत्यसंस्कार....