आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवसाला न पावल्यामुळे देव आरोपीच्या पिंजर्‍यात, जाणून घ्या काय आहे वास्तव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांकेर/रायपुर (छत्तीसगड) - रायपूर जवळ असलेल्‍या कांकेर गावात शनिवारी दिवसभर पंचायत बसली. या पंचायतीमध्‍ये 200 देवी-देवतांना आरोपीच्‍या पिंज-यात उभे करण्‍यात आले. यापै‍की 50 देवी-देवतांवर नवसाला पावले नसल्याचा आरोप ठेवून शिक्षा सुनावण्‍यात आली. शिक्षेचे स्वरुप देवांना मंदिराबाहेर काढणे असे होते. काही देवांना 6 महिन्यासाठी तर काही देवींना दोन वर्षांसाठी मंदिराबाहेर ठेवण्‍याचा निर्णय पंचायतीमध्‍ये घेण्‍यात आला.
दरवर्षी भंगाराम देवीच्‍या मंदिरामध्‍ये यात्रेचे आयोजन करण्‍यात येते. यावेळी जपवळपासच्‍या सर्व गावातील लोक आपापले देवी-देवता घेऊन यात्रेसाठी येतात. गावकर्‍यांनी यात्रेसाठी आणलेल्‍या देवी-देवतांची संख्‍या 200 च्‍या जवळपास असते. या देवी-देवतांना गावातील नागरिक नवस बोलतात. गावातील रोगरायी दुरू होण्‍यासाठी, शेतातील पीक चांगले येण्‍यासाठी नवस केले जातात. कोणत्‍या देवीला कोणता नवस केला. गावात कोणते आजार कोणत्‍या देवी-देवतांमुळे आले. याचे तर्क या पंचायतीमध्‍ये लावले जातात. बोललेल्या नवसाप्रमाणे घडले नाही, तर देवी-देवतांना दोषी ठरविले जाते. एवढ्यावरच भक्त थांबत नाहीत, तर ते देवांनाच शिक्षा सुनावतात.

ज्या देवांनी नवस पूर्ण केला. त्यांना कोंबडी, बकरा आणि डुक्कराचा बळी देऊन खूष केले जाते.

पंचायतीने निर्दोष ठरवलेल्‍या देवी-देवतांना मंदिरात प्रवेश
शनिवारी रात्री उशीरापर्यंत पंचायतीचे कामकाज चालू होते. ज्‍या देवी-देवतांवर आरोप सिद्ध झाले नाही. त्‍यांना रविवारी दुपारी 12 पर्यंत परत मंदिरामध्‍ये प्रवेश दिला जाणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या यात्रेची छायाचित्रे...