आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Were Feed By Mother Death Body In Chhattisgarh

नसबंदी शिबिरः आईच्या मृतदेहातून करण्यात आले फीडिंग, 39 चिमुकल्यांचे हरवले मातृछत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- नसबंदीत मृत्युमुखी पडलेली बैगा आदिवासी महिला चैतीबाई हिची 10 महिन्यांची मुलगी आजीसोबत.)
रायपूर (छत्तीसगड)- राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या नसबंदी शिबिरात हलगर्जिपणा झाल्याने 15 महिला मृत्युमुखी पडल्या असून त्यांच्या 39 चिमुकल्यांचे मातृछत्र हरवले आहे. यातील काही चिमुकले आईच्या दुधावर अवलंबून आहेत. एका महिलेचा मृतदेह अॅम्बुलंसमध्ये ठेवला असताना तिची चिमुकली प्रचंड आक्रोष करीत होती. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी मृतदेहातून चिमुकलीला फीडिंग केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. दोन चार दिवसांपूर्वी घडलेली ही घटना बालदिनाला आठवल्यावर निश्चितच भावना उचंबळून येतात.
धनौली गावातील बैगा आदिवासी महिला चैतीबाई हिचीही या शिबिरात नसबंदी केल्याने मृत्यू झाला. तिला 10 महिन्यांची मुलगी आहे. चैतीबाईचा मृतदेह अॅम्बुलंसमधून गावी नेण्यात येत होता. यावेळी आजीच्या कडेवर असलेल्या चिमुकलीने खुप आक्रोष केला. तिला आईच्या दुधाची गरज होती. ती सध्या आईच्या दुधावरच आहे. अशा वेळी काय करावे आणि काय करु नये, हे कुटुंबीयांना काही समजेना. अखेर चिमुकलीचा आक्रोष सहन न झाल्याने आईच्या मृतदेहातून फीडिंग करण्यात आले. त्यानंतर चिमुकलीला बाहेरचे दुध देण्यात आले.
बैगा आदिवासी ही जमात नाहिसी होण्याच्या मार्गावर आहे. या आदिवासी जमातीतील महिलांची नसबंदी म्हणजे जमात नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तरीही प्रलोभने दाखवून या जमातीतील महिलांवर नसबंदी करण्यात आली. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
पुढील स्लाईडवर बघा, मातृछत्र हरपलेले चिमुकले...