आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couple From France On World Tour On Their Bicycle

फ्रान्सचे नवरा-बायको निघाले जग भ्रमंतीला, अनोखी आहे यांची सवारी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- व्यवसायाने इंजिनिअर असलेला फ्रान्सचा नागरिक बेनॉइट त्याची रिसर्चर फ्रेंड लॉरेसोबत तीन महिन्यांपूर्वी जगभ्रमण करायला निघाला आहे. शुक्रवारी दोघे रायपूरला पोहोचले. फ्रान्सपासून अनेक देशांची सफारी करीत दोघे भारतात आले आहेत. दोघांची युनिक सायकल लोकांच्या चर्चाचा विषय होताना दिसून येत आहे.
असे आहे सायकलचे डिझाइन
ही एक स्पेशल स्लिपिंग सायकल आहे. यावर लेटूनही आरामात सायकल चालवता येते. हॉलंडमध्ये या सायकलची निर्मिती करण्यात आली आहे. याला चार चाके असून दोन चाकांचे हॅंडल अगदी साध्या सायकलसारखे आहे. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या दोन चाकांचे पायडल वर तर हॅंडल त्याच्या खाली आहे. या चाकांवर असलेली सीटही आरामदायी आहे. त्यावर लेटून सायकल चालवता येऊ शकते.
अनेक देशांची केली आहे भ्रमंती
सिंगापूर, मलेशिया, थायलंड, म्यानमार येथून भारतातील मणिपूर आणि त्यानंतर बांगलादेश असा टप्पा दोघांनी गाठला. त्यानंतर दोघे भारतात परतले. कोलकतामार्गे मुंबई आणि त्यानंतर रायपूरला आले. दोघांनी जीईरोडवरील एका मॉलमध्ये शॉपिंग केली. फिरणे आणि सायकलींग दोघांचे पॅशन आहे.
पालक पनीरचे दिवाने
भारतीय आदरातिथ्य दोघांना खुप भावले. पालक पनीर, आलू गोबी, चपाती आणि पराठे या खाद्यपदार्थांनी त्यांना वेड लावले आहे. भारतातून इराण, तुर्की या रस्त्याने जात दोघे फ्रान्सला परतणार आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, बेनॉइट आणि त्याची रिसर्चर फ्रेन्ड लॉरे अफलातून सायकलसोबत भ्रमंती करताना...