आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमध्ये तृतीयपंथीय मधू किन्नर रायगडचे महापौर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड- छत्तीसगडमधील रायगड नगरपालिका निवडणुकीत भाजप प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत एका तृतीयपंथीयाने महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.
मधू किन्नर या अपक्ष उमेदवाराने भाजपच्या महावीर गुरुजींविरोधात ४,५३७ मतांनी विजय मिळवला. छत्तीसगड राज्यात महापौरपदाची निवडणूक जिंकणारे 35 वर्षीय मधू हे पहिले तृतीयपंथीय नागरिक आहेत. जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवण्याचे आश्वासन या वेळी मधू किन्नर यांनी दिले.
काँग्रेसची स्थिती सुधारली
लोकसभानिवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारली आहे. दहापैकी चार पालिका काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. भाजपला सहापैकी चार पालिका मिळाल्या असून दोन शहरांत अपक्षांचे वर्चस्व आहे. राज्यात ११ वर्षांनी काँग्रेसची भाजपवर मात, १० पैकी चार नगरपालिका ताब्यात घेतल्या