आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Interview Of Dr. Nagendra PM Told Kejriwal To Consult Him

Exclusive : 7 दिवसांत केजरीवाल यांचा खोकला बरा करेन, डॉ. नागेंद्र यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे पोलिस आयुक्त बस्सी यांच्य अॅट होम रिसेप्शनमध्ये पंतप्रधानांनी अरविंद केजरीवाल यांना बंगळुरूच्या ज्या डॉ. नागेंद्र यांचे उपचार घेण्याचा सल्ला दिला होता, ते डॉ. नागेंग्र आता केजरीवाल यांची वाट पाहत आहेत. विवेकानंद योग संशोधन संस्था (व्यासा) चे संस्थापक डॉ. एचआर नागेंद्र म्हणाले की, केजरीवाल जर त्यांच्या योग संस्थेत आले तर कोणत्याही स्थितीत त्यांचा 15 वर्षे जुना खोकला बरा करून दाखवेन. त्यानंतर त्यांना कोणतीही औषधेही घ्यावी लागणार नाहीत, असेही नागेंद्र म्हणाले आहेत.
फोटो : डॉ. एच.आर.नागेंद्र
आम्ही बेंगळुरूच्या डॉ. एच.आर. नागेंद्र यांच्याशी या बाबात खास चर्चा केली. त्यात गुरुजीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ. नागेंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाबरोबर असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या संबंधांचा उल्लेखही यावेळी केला. पंतप्रधानांनी माझे काम पाहिले आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला असेही डॉ. नागेंद्र यावेळी म्हणाले.
मुलाखतीचा काही भाग...
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवालांकडे तुमचा उल्लेख केला आहे, तुम्ही त्यांना आधीपासून ओळखता का?
गुरुजी - मोदीजींनी 4 ते 5 वेळा व्यासा संस्थेला भेट दिली आहे. त्यांनी येथील उपचार पद्धती अगदी जवळून पाहिली आहे. त्यामुळेच त्यांनी माझे नाव घेतले आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

- तुम्ही केजरीवालांचा खोकला दूर करू शकता का?
गुरुजी - खरं तर केजरीवाल यांनी अॅलर्जी आहे, त्यावर आम्ही गेल्या 35 वर्षांपासून काम करत आहोत. आजपर्यंत 2000 हून अधिक लोकांनी माझ्याकडे उपचार घेतले आहेत, आणि ते सर्व सध्या निरोगी आहेत.

- केजरीवाल यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
गुरुजी - त्यांना याठिकाणी यावे लागेल आणि एक आठवडा येथे राहून येथील पद्धतीने उपचार घ्यावे लागतील. आतापर्यंत त्यांनी अॅलोपॅथिक उपचार घेतले आहेत. त्यात काही वेळ आराम मिळतो. पण आम्ही योगाच्या माध्यमातून त्यांचा खोकला दूर करू शकतो. त्यांनी याठिकाणी यावे, आम्ही एका आठवड्यात त्यांच्यावर उपचार करू. मग त्यांचा खोकला कितीही जुना असू द्या.

- बाबा रामदेव आणि आरएसएसशीही तुमचा संबंध आहे. त्यामुळेच मोदींशी जवळीक आहे का?
गुरुजी - माझे काका आरएसएसचे प्रचारक होते. तेव्हापासूनच संघाचे इतर प्रचारक आणि पदाधिकाऱ्यांचे येणे जाणे सुरू असायचे. आम्ही संघ प्रचारकांचा मोफत उपचार करतो. कारण ते राष्ट्रहिताचे काम करतात.

- केजरीवालचाही मोफत उपचार कराल का?
गुरुजी - ते म्हणतील तसे करी. पण आधी त्यांनी यायला हवे. त्यांचा खोकला बरा व्हावा असे, आम्हालाही वाटते.
पुढे पाहा, डॉ. नागेंद्र यांचे एक्सक्लुसिव्ह PHOTO