आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या कुत्र्यांच्या गराड्यात सापडली होती ही चिमुकली, आता मिळाले नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर (छत्तीसगड)- काही दिवसांपूर्वी शहरातील एका कचरापेटीत आणि काही भटक्या कुत्र्यांच्या गराड्यात एक चिमुकली सापडली होती. तिचे नाव अनुकृती असे ठेवण्यात आले आहे. दैनिक भास्करच्या आवाहनावर नागरिकांनी तब्बल पाच हजार नावे तिच्यासाठी सुचविले होते.
काय आहे प्रकरण
- बिलासपूर या शहरात 28 नोव्हेंबर रोजी ही चिमुकली कचरापेटीत सापडली होती. तिला भटक्या कुत्र्यांनी घेरले होते.
- एका गृहस्थाने पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर तिला अनाथलयात पाठविण्यात आले.
डोळ्यांत तराळले अश्रू
- या चिमुकलीचा नामकरण सोहळ काल आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिलांनी चिमुकलीचे लाड केले.
- या चिमुकलीचे नाव अनुकृती ठेवण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळून आले होते.
पाच हजार नावांमधून झाली निवड
- अनुकृती हे नाव तिला सुमारे पाच हजार नागरिकांनी दिले आहे.
- नागरिकांकडून आलेल्या पाच हजार नावांच्या चिठ्ठ्या एका डब्यात टाकण्यात आल्या.
त्यानंतर एका मुलीच्या हाताने एका चिठ्ठी काढण्यात आली
कलेक्टर म्हणाले- चिमुकलीच्या नावाने उघडणार बॅंक अकाऊंट
- बिलासपुरचे कलेक्टर पी. अन्बलगन म्हणाले, की आम्ही तिच्या नावाने एखाद्या नॅशनलाईज बॅंकमध्ये खाते उघडणार आहोत.
- त्यानंतर इच्छूक नागरिकांना यात मदतीची रक्कम जमा करता येईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन नामकरण सोहळ्यात महिलांच्या डोळ्यांत तराळले अश्रू.....
बातम्या आणखी आहेत...