रायपूर (छत्तीसगड)- दल्लीराजहरापासून गुदुमपर्यंतचा 15 किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. त्यावरुन प्रायोगित तत्वावर रेल्वेही चालविण्यात आली आहे. पण या नक्षलप्रभावित परिसरात रेल्वे चालविणे एखादा धोका पत्करण्यापेक्षा कमी नाही. ट्रॅकचे उद्घाटन करण्यापूर्वी या मार्गाच्या दोन्ही बाजूंना सीआरपीएफच्या दोन बटालियन बंदोबस्तात राहणार आहेत. यावेळी सुमारे दोन हजार जवान रेल्वेमार्ग आणि सिग्नलचे रक्षण करतील. राजहरा या स्टेशनपासून ही ट्रेन सुटणार आहे. यावेळी या रेल्वेत 150 सशस्त्र जवान असतील. हा रेल्वेमार्ग केवळ अर्ध्या तासाचा आहे.
प्रवाशांची तीन स्तरीय तपासणी
या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना तीन स्तरीय सुरक्षा प्रणालीतून जावे लागेल. सुरवातील स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच सुरक्षा तपासणी केली जाईल. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पुन्हा तपासणी केली जाईल. डब्यांमध्ये गेल्यावर अंतिम सुरक्षा तपासणी असेल. या ट्रॅकवर पहिल्यांदा पॅसेंजर ट्रेन आणि नंतर मालगाडी चालवली जाईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या नवीन रेल्वेमार्गाचे फोटो...