आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश विकल्यापेक्षा चहा विकलेला बरा, नरेंद्र मोदींनी मारले एका दगडात दोन पक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड (छत्तीसगड)- देश विकल्यापेक्षा चहा विकलेला कधीही बरा. चहा विकणे काही गुन्हा नाही. चहा विकणारा पंतप्रधान होईल अथवा नाही याचा निर्णय देश घेईल, अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसला चांगले तिखट उत्तर दिले.
समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी मोदींवर टीका करताना चहा विकणारा देशाला पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगितले होते. चहा विकणाऱ्याचा राष्ट्रीय दृष्टिकोण राहू शकत नाही, असेही ते म्हणाले होते. कॉंग्रेसनेही चहा विकण्याच्या मोदींच्या वक्तव्यावर टीका केली होती.
रॅलीला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, की केंद्र सरकारमध्ये असलेले कॉंग्रेसचे नेते दिवसभर मोबाईल चेक करीत असतात. मोदी कुठे आहेत, याची माहिती घेत असतात. कॉंग्रेसकडे दोनच कामे राहिली आहेत. एकतर सोन्याचा शोध घेणे किंवा मोदीला शोधणे. त्यांना हे माहित नाही, की येथील लोकांच्या घामात सोने आहे.
मोदींची रॅलीतील छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर