आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींना मोदी म्हणाले \"आजारी\"; राहुलला म्हणाले, मामाकडून पैसे आणले का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेमेतरा (छत्तीसगड)- छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जोरदार प्रचार करीत आहेत. छत्तीसगडमध्ये आज (गुरुवार) त्यांच्या पाच सभा आहेत. मोदींची पहिली सभा बेमेतरा येथे झाली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला. यावेळी मोदी म्हणाले, की येथे दिल्लीतून अनेक लोक येत आहेत. मॅडम आल्या होत्या, शहजादा आला होता. दिल्लीचे शासक येथे येऊन पैसे देण्याची आश्वासने देतात. येथील जनता काय भिकारी आहे? हे लोक मामाच्या घरून पैसे घेऊन आले आहेत का?
भाजपच्या सरकारने छत्तीसगडला बर्बाद केले, असा आरोप राहुल गांधी यांनी छत्तीसगडला झालेल्या सभेत केला होता. आमचे दिल्लीतील सरकार निधी पाठविते. परंतु, राज्य सरकार त्याचा उपयोग करीत नाही, असेही राहुल म्हणाले होते.
सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "मॅडम तुम्ही आजारी आहात. आता तुमच्या मुलाला जबाबदारी द्या. एखाद्या राज्याची जबाबदारी द्या आणि 24 तास वीजपुरवठा करून दाखवा. त्यानंतर अशी आश्वासने द्या." राहुल गांधी छत्तीसगडमध्ये प्रचार करताना 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देत आहेत. मोदी म्हणाले, की कॉंग्रेसची अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे. तेथे 24 तास वीजपुरवठा केला जात आहे का?
जोगी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी का जाहीर केले जात नाही, म्हणाले मोदी, वाचा पुढील स्लाईडवर