आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकत्याच झालेल्या चकमकीत मारले गेले होते 35 माओवादी, वाचा Inside स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- बस्तर क्षेत्रातील पिडमेलमध्ये 11 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सात जवान शहीद झाले होते. यावेळी माओवाद्यांचे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती मिळालेली नव्हती. या कारवाईत 35 माओवादी ठार आणि 15 जखमी झाले होते, असे या चकमकीत सहभागी झालेल्या माओवाद्यांचा कमांडर सोढी रामा उर्फ कन्ना याने सांगितले आहे.
गेल्या गुरुवारी भाकपा माओवादी दक्षिण बस्तर डिव्हिजनचा कमांडर कन्ना याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. माओवादी ऑपरेशन्सचे अतिरिक्त महासंचालक आर. के. वीज यांनी त्याला मीडियासमोर सादर केले.
कन्ना याने सांगितले, की गेल्या काही दिवसांमध्ये चकमकीत माओवाद्यांचे झालेले हे सर्वात मोठे नुकसान आहे. परंतु, आम्हाला कमांडर गणेशने सांगितले होते, की याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला नको. आम्ही ही माहिती गोपनिय ठेवली.
अनेक वरिष्ठ माओवादी ठार झाले
भाकपा माओवादीच्या बटालियनचा डेप्युटी कमांडर सीतू आणि कोंटा एरियाचा सचिव अर्जुन याचाही या चकमकीत मृत्यू झाला होता. या दोघांसह तब्बल 35 माओवादी यात ठार झाले होते. त्यांच्यावर जंगलातच अंत्यसंस्कार करण्यात आले. याची माहिती गोपनिय ठेवण्यात आली.
अशी झाली चकमक
11 एप्रिल रोजी पोलिस पार्टी येत असल्याची सूचना आम्हाला मिळाली. यावेळी आम्ही जेवण तयार करीत होते. ते सोडून शस्त्रसाठा घेऊन आम्ही निघालो. त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने माओवादी उपस्थित होते. आम्ही पिडमेल गावाच्या दिशेने निघालो. तेव्हा उंच भागावर पोलिस दिसून आले. आम्ही सी आकाराचा घेरा तयार केला. पोलिसांवर जोरदार फायरिंग केले. यावेळी पोलिस उंच भागावर अगदी सेफ होते. आम्ही खालच्या बाजूला होतो. यामुळे आम्हाला मोठी जिवीत हानी झाली. सकाळी 11 पर्यंत फायरिंग सुरु होती.
माहिलाही होत्या सामिल
चकमकीत सुमारे दिडशे माओवादी सामिल झाले होते. यात 20 ते 25 महिलाही होत्या. यावेळी माओवाद्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. कमांडर स्तरावरील माओवाद्यांनी बुलेटफ्रुप जॅकेट घातले होते.
पुढील स्लाईडवर बघा, चकमकीशी संबंधित फोटो... जखमी झालेले जवान...