आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चिमुकल्याला खुर्ची वाजवताना बघून पंतप्रधान मोदींनीही वाजवली खुर्ची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभर छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नक्षलग्रस्त दंतेवाडा येथील जावंगामधील एज्युकेशन सिटीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. एज्युकेशन सिटीमधील एका शाळेत ग्रुपफोटो काढण्यासाठी पंतप्रधान गेले तेव्हा एक चिमुकला खुर्ची वाजवत होता. यावेळी मोदींनी जरा वेळ चिमुकल्याला बघत स्वतःही खुर्ची वाजवण्यास सुरवात केली. सुमारे दोन मिनिटे ही जुगलबंदी सुरु होती.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पंतप्रधान आपल्या शाळेत आल्याचे बघून विद्यार्थी बरेच उत्साहित होते. त्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. काहींनी त्यांना सक्सेस टिप्स मागितल्या तर काहींनी तुम्ही एवढे काम करता तरी थकत का नाही, असे विचारले. काहींनी विचारले, की तुम्ही नेते नसता तर काय केले असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पंतप्रधान मोदींनी चिमुकल्यासोबत कशी वाजवली खुर्ची... असा काढला ग्रुपफोटो....