Home »National »Chhatisgarh» Naxal Attack In Kanker Chhattisgarh

कांकेरमध्ये बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; हॅलिकॉप्टरने अतिरिक्त कूमक रवाना

दिव्य मराठी वेब टीम | May 11, 2017, 14:49 PM IST

  • कांकेरमध्ये बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक;  हॅलिकॉप्टरने अतिरिक्त कूमक रवाना
कांकेर- छत्तीगडमधील पंखाजूरमध्ये पेट्रोलिंगसाठी निघालेल्या बीएसएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

बीएसएफच्या जवानांनी दिले प्रत्युत्तर...
- बीएसएफचे पथक पंखाजूर भागात गुरुवारी सकाळी पेट्रोलिंगसाठी निघाले होते. बांदे भागात कुरेणार नदीजवळ दबा धरुन बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. जवानांनी नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु असून अतिरिक्त कुमक हॅलिकॉप्टरने रवाना झाले आहेत.

हेही वाचा...
छत्तीसगड हल्ला: 26 जवान शहीद, जखमी सहकार्‍यास खांद्यावर घेवून पार केले घनदाट जंगल

Next Article

Recommended