प्रत्येकाच्या आरोग्यावर देशात / प्रत्येकाच्या आरोग्यावर देशात खर्च होतात एकूण 1491 रुपये

वृत्तसंस्था

Apr 02,2017 03:42:00 AM IST
नवी दिल्ली - भारत आपल्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर एका वर्षात केवळ २३ डॉलर म्हणजेच सुमारे १४९१.५२ रुपये खर्च करते, तर अमेरिकेत हाच खर्च ४,५४१ डॉलर म्हणजेच सुमारे २ लाख ९४ हजार ५१० रुपये आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी जागतिक आरोग्य खर्च डाटाबेस-२०१४ च्या अहवालाचा हवाला देऊन सांगितले की, भारतात आरोग्यावर प्रतिव्यक्ती २३ डॉलर खर्च केला जातो, तर अमेरिका आपल्या एका नागरिकाच्या आरोग्यावर वर्षाला ४,५४१ डॉलर खर्च करते. कॅनडामध्ये प्रतिव्यक्ती ३,७५३ डॉलर खर्च केला जातो.
X
COMMENT