आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: एक मित्र नदीत बुडत होता, दुसरा काठावर बसून त्याचे फोटो टिपत होता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- सहा मित्र खारुन नदीत पोहोयला गेले होते. यावेळी एक मित्र अचानक गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवणे जवळपास अशक्य होते. यावेळी नदीच्या काठावर बसलेल्या मित्राने त्याचे बुडतानाचे फोटो काढले. त्यानंतर याची माहिती गावातल्या लोकांना दिली.
नदीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव जाहिद महंमद असे आहे. राजेश, दिलशाद कुरेशी, यासीन, जिम्मी आणि वसीम या मित्रांसोबत तो नदीत पोहोयला गेला होता. खारुन नदीच्या एक भागाला मौतका कुआ असे म्हटले जाते. या भागात जाहिदचा बुडून मृत्यू झाला. नदीत तयार झालेल्या भवऱ्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
पाच मित्र नदीत पोहोत असताना एक मित्र नदीच्या किनाऱ्यावरुन फोटो काढत होता. यावेळी त्याच्या लक्षात आले की जाहिद बुडत आहे. पण इतरांची त्याच्याजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. तो भवऱ्यात अडकला होता. अखेर जाहिद पाण्यात दिसेनासा झाला. पण याचेही फोटो किनाऱ्यावर असलेल्या मित्राने टिपले.
यापूर्वीही अशा प्रकारे या नदीने अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन पाणबुडे आणि क्रायसिस मॅनेजमेंट टीम नदीच्या शेजारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वास्तविक अजूनही ही टीम येथे नाही. त्यामुळे अनेकांची जीव जात आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे इतर फोटो....