आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Cabinet Minister Majithia Clean Utensil And Shoes News In Marathi

जाणून घ्या, पंजाबच्या मंत्र्याने गुरुद्वारातील भाविकांचे बुट का केले पॉलिश आणि भांडी का धुतली?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटिंडा/अमतसर/आनंदपूर साहेब- श्री गुरु गोविंदसिंगजी यांच्या वाणीत फेरबदल करून ती लोकांसमोर सादर केल्याने श्री अकाल तख्त साहेब यांनी बजावलेली शिक्षा पंजाबचे कॅबिनेट मंत्री बिक्रमसिंग मजीठिया यांनी पूर्ण केली. त्यांनी सकाळी तख्त श्री केसगड साहेब आणि दुपारी तख्त श्री दमदमा साहेब येथे लंगर लावले, भाविकांचे बुट पॉलिश केले आणि भांडीही धुतली.
धार्मिक शिक्षेअंतर्गत मजीठिया यांना पाचही तख्त साहेब येथे अशी सेवा द्यावी लागणार आहे. श्री गुरु गोविंदसिंगजी यांच्या वाणीत फेरबदल केल्याने श्री अकाल तख्त साहेब यांनी मजीठिया यांना जाब विचारला होता. त्यावर मजीठिया यांनी स्वतः तख्त साहेब यांच्या समोर सादर होत माफी मागितली होती. त्यानंतर त्यांना पाचही तख्त साहेब येथे जाऊन लंगर लावणे, भाविकांचे बुट पॉलिश करणे आणि भांडी धुण्यासारखी शिक्षा बजावण्यात आली आहे.
पंजाबचे कॅबिनेट मंत्री मजीठिया यांनी सहकाऱ्यांसह कसे केले काम, बघा पुढील स्लाईडवर