आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चुलीतील कोळशाने चित्र साकारणारा जादूगर, पंतप्रधानांनी केले कौतूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या पेंटिंगसाेबत विजय बिस्वाल. - Divya Marathi
आपल्‍या पेंटिंगसाेबत विजय बिस्वाल.
रायपूर - रेल्‍वेमध्‍ये टीसी राहिलेले वरिष्‍ठ चित्रकार विजय बिस्‍वाल हे चुलीतील कोळशापासून अप्रतिम चित्र साकारतात. बालपणापासून छंद जोपासलेल्‍या विजय यांच्‍या कलाकृतींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले आहे. नागपुरमध्‍ये राहणा-या विजय यांचे म्‍हणने आहे, "उदरनिर्वाहासाठी नोकरी गरजेची असतेच. पण चित्रकलेला ही माझ्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. शिक्षणानंतर मी नोकरी करावी यासाठी घरातून तगादा लावण्‍यात आला होता.''
विजय सांगतात, '' मी 1990 मध्‍ये रेल्‍वेमध्‍ये जॉईन झालो. स्‍थानकावर मिळालेल्‍या फावल्‍या वेळात मी चित्रे काढत असायचो. यामुळेच माझ्या सर्वोत्‍कृष्‍ठ चित्रांच्‍या संग्रहात रेल्‍वे स्‍थानकावरील चित्रे आहेत.'' लहानपणापासून त्‍यांना चित्रकलेची आवड होती. चुलीतील कोळशांसोबत ते खेळत होतो. या सवयीतूनच त्‍यांना हा छंद लागला. असे ते सांगतात.
बिस्वाल सांगतात त्‍यांची कथा
'' ओडिशाच्‍या अंगुल जिल्‍ह्यात 1964 मध्‍ये माझा जन्‍म झाला.मी शाळेत गेल्‍यावर माझ्यातील चित्रकलेचा विकास होत गेला. शिक्षकांकडचे उरलेले खडू मी घरी नेत असायचो. घरी भितींना मी बोर्ड बनवला होता, त्‍यावर माझी चित्रे विविध आकार घेत असत. पुढे पेंन्‍सिल, कलर, वॉटर कलर आदी विविध साहित्‍य वापरून मी चित्रे काढू लागलो. महाविद्यालयीन जिवनात मला मातीपासून मुर्तीकला शिकता आली. पुढे साइन बोर्ड बनवण्‍याचे कामही मी केले, यातून मला पैसे मिळू लागले. माझे काही चित्रे मासिकांमध्‍येही प्रकाशित झाली. यातूनही मला पैसे मिळत होते.
'विजया'चा सन्‍मान
इं‍डो‍नेशियातील बुद्ध, गांधी, मदर टेरेसा आर्ट शोमध्‍ये भारतातील दहा कलाकारांच्‍या टीममध्‍ये सहभाग.
मुंबई आर्ट फेस्टिव्‍हल, जयपूर आर्ट फेस्टिव्‍हलमध्‍ये आशियाई कला सादरीकरणाची संधी.
गुजरातमधील ऑल इंडिया आर्ट स्‍पर्धेत राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते राजा रवि वर्मा अभिवादन पुरस्‍काराने गौरव.
एका पेंटिंगची तुर्कीच्‍या इंस्‍तंबूल वॉटरकलर सोसायटीच्‍या मासिक स्‍पर्धेत निवड.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, विजय बिस्‍वाल यांच्या काही पेंटिंग..