आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi In Chhattisgarh, Accuses BJP Of Being Anti poor

छत्तीसगडमध्ये विकासाच्या नावावर नुसतीच बोंबाबोंब, सोनिया गांधी यांचा सडकून प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबिकापूर\\भिलाई- छत्तीसगडमध्ये विकासाच्या नावावर नुसती बोंबाबोंब असून गेल्या दशकात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली आहे, असा प्रहार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी छत्तीसगड सरकारवर केला आहे.
नियमित प्रकारच्या रॅलींना फाटा देऊन सोनिया गांधी यांनी आज रॅलीतील लोकांशी संवाद साधला. त्यांनी लोकांना काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे उत्सूकतेने जाणून घेतली. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, की छत्तीसगडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसविली जात आहे. बहुतांश भागात राज्य सरकार केवळ कागदावर असल्याचे दिसून येत आहे. विकासाला खीळ बसली आहे. अशा वातावरणात राज्याचा विकास होणार नाही.
सोनिया गांधी म्हणाल्या, की हजारो लाखो कोटी रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. तरीही येथील विकास झालेला नाही. भाजप सरकारकडून विकासाच्या नुसत्या बाता केल्या जातात. परंतु, प्रत्यक्षात काहीही विकास झालेला दिसून येत नाही.
कॉंग्रेसचा आश्वासनांपेक्षा कामावर भर, म्हणाल्या सोनिया गांधी, वाचा पुढील स्लाईडवर