आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Visits Bilaspur Hospital, Siprocin Tablet Include Rat Killer

नसबंदी शिबिरः महिलांना देण्यात आले होते उंदिर मारण्याचे विष असलेले औषध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बिलासपुरच्या रुग्णालयाला भेट दिली.)
रायपूर (छत्तीसगड)- बिलासपूर जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या नसबंदी शिबिरात 17 महिलांचा मृत्यू झाला. या महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज बिलासपुरला गेले आहेत. या दरम्यान, छत्तीसगड सरकारने सांगितले आहे, की नसबंदीनंतर महिलांना देण्यात आलेल्या औषधात उंदिर मारण्याचे विष होते. छत्तीसगडचे प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. आलोक शुक्ला यांनी सांगितले, की सिप्रोसिन नावाच्या या औषधात विषारी जिंक फॉस्फेट होते. उंदिर मारण्याच्या औषधात जिंक फॉस्फेट वापरले जाते.
आलोक शुक्ला यांनी सांगितले, की जप्त करण्यात आलेल्या औषधांची बिलासपुर सायंस कॉलेजमधील लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. यात जिंक फॉस्फेट मिळाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर औषध तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी कारखान्यात जिंक फॉस्फेट मिळाले. औषध तयार करताना त्यात जिंक फॉस्फेट टाकण्यात आले होते. आता औषधांचे सॅम्पल्स दिल्ली आणि कोलकत्यातील लॅबमध्येही पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमधून या औषधाच्या 33 लाख टॅबलेट जप्त करण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, औषधाच्या कारखान्यावर मारण्यात आलेला छापा... त्यापूर्वी औषधे जाळण्यात आली... राहुल गांधी यांचा दौरा....