आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Thieves Raped 70 Yrs Old Woman And Looted Her Home

चाकूचा धाक दाखवून 70 वर्षांच्या म्हातारीवर सामूहिक बलात्कार, घरही लुटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- अशा प्रकारे परिसरातील कारला आग लावण्यात आली.)
रायगड (छत्तीसगड)- 70 वर्षांच्या म्हातारीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर तिघांनी तिचे घर लुटण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
वार्ड क्रमांक चारमधील एका घरी 70 वर्षांची म्हातारी एकटी राहत होती. अजय सारथी, जय सारथी आणि आनंद यांना याची माहिती मिळाली होती. त्यांनी घराची रेकी केली. त्यानंतर एके रात्री घरात प्रवेश केला. तिघांनी 70 वर्षांच्या म्हातारीवर आळीपाळीने बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून म्हातारीला दमदाटीही केली. त्यानंतर घरातील सामान उलटापालट केले. तरीही आपण सापडू अशी भीती असल्याने तिघांनी या घराबाहेर असलेल्या पाच कारला आग लावली.
पहाटेच्या सुमारास या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तिघेही रायगड पंचायत समितीत स्विपर म्हणून काम करतात.
पुढील स्लाईडवर बघा, आग लावण्यात आलेल्या कार... आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी...