छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी एक भव्य दिव्य पोस्टर तयार करण्यात आले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जगातील सर्वात मोठे पोस्टर तयार करण्यात आले असल्याचा दावा केला जाता आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या कार्यक्रमानिमीत्त 250 फुट उंचीचे पोस्टर तयार करण्यासाठी 120 कामगारांनी 30 दिवस सतत काम केल्यानंतर हे पोस्टर पूर्ण झाले. जगातील सर्वात मोठ्या पोस्टरवर भारताच्या सर्व पंतप्रधानांची फोटो देण्यात आली आहेत.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ रमन सिंग यांनी पोस्टरचे अनावरण केले. यावेळी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे अधिकारी उपस्थित हेाते. हे पोस्टर तयार करण्याची जबाबदारी ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ आणि रूंगटा ग्रुप यांच्याकडे देण्यात आली होती.
काय आहे या पोस्टरचे वैशिष्ट्ये -
हे पोस्टर विदेशात तयार केलेले नसून रायपूरमध्ये तयार केले आहे. हे पोस्टर पाहण्यासाठी रायपूरमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे संयोजक डॉ. जवाहर सुरीशेट्टी यांनी सांगितले की या आगोदर अमेरिकेत ‘बॉस’ चित्रपटाचे सर्वात मोठे पोस्टर तयार करण्यात आले होते. 34 हजार वर्गफुट क्षेत्रफळाचे हे पोस्टर होते.
पुढील स्लाईडवर पाहा सर्वात मोठ्या पोस्टरची फोटो...