आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा; ही तर शेतक-यांच्या नावाखाली नौटंकी- दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शेतक-यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत पक्षविरोधी भूमिका घेणारे भंडारा- गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज दुपारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे नाना पटोले यांनी राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, नाना पटोले यांना अशी चमकोगिरी करण्याची सवयच आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी असाच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. आताही शेतक-यांच्या नावाखाली ते नौटंकी करत असून, त्याचाच भाग म्हूणून त्यांनी राजीनामा दिला आहे. आमचे सरकार शेतकरी, दुर्बल घटक व सर्व सामान्यांसाठीच काम करत आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी पटोलेंच्या राजीनाम्याबाबत दिली आहे.

 

नाना पटोले गेले काही महिने पक्षविरोधात भूमिका घेताना दिसत होते. शेतक-यांचे प्रश्न उपस्थित करून केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारला ते लक्ष्य करत होते. मोदी पक्षाच्याच नेत्यांचे व खासदाराचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. काही प्रश्न किंवा मुद्दे उपस्थित केले की चिडतात असा आरोपही पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केला होता. फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल करताना हे सरकार जनतेच्या हिताला प्राधान्य देत नसल्याचे सांगत वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. मात्र, भाजप श्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते. याच काळात विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर गेले होते. मागील काळात ते उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटले होते. राहुल गांधी यांनाही ते गुजरात निवडणुकीनंतर भेटणार आहेत. अशोक चव्हाण यांनी तर पटोले यांना काँग्रेसमध्ये येण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

 

दोन दिवसापूर्वी अकोल्यात ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनात नाना पटोले यांनी सहभाग घेतला होता. तसेच भाजप सरकार सर्वसामान्य जनता व शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने पक्षातील अनेक नाराज नेते यात सहभागी होतील असे वक्तव्य केले होते. या आंदोलनाला मतता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या आंदोलनानंतर दोनच दिवसात नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...