आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 1 Dead In An Explosion In Naya Bazar; Anti Terror Wing And Special Cell At The Spot

फटाक्यांच्या पोत्याचा स्फोट, एकाचा मृत्यू; दहशतवादविरोधी पथक-स्पेशल सेल घटनास्थळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत. - Divya Marathi
स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत.
नवी दिल्ली- चांदणी चौकातील नव्या बाजारात मंगळवारी सकाळी फटाक्यांनी भरलेल्या पोत्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आणि चौघे जखमी झाले. मृतांच्या खिशातून जप्त केलेले सिम कार्ड आणि रेल्वे तिकिटाच्या मदतीने त्याची ओळख मुर्शिदाबाद (बंगाल) निवासी मातालिप मिर्झा या स्वरूपात झाली आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व चार लोकांना सेंट स्टिफन्स रुग्णालयात भरती केले गेले आहे. त्यांची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी डॉ. अनिल बन्सल म्हणाले, ही घटना सकाळी साधारणत: १०.३८ वाजता झाली. सफेद रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती प्लास्टिकचे दोन जड पोते आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर ठेवून चालला होता. नव्या बाजाराच्या पट्टेवाल्या गल्लीत काही दूर गेल्यानंतर या व्यक्तीने आपल्या खांद्यांवरून या दोन्ही पोत्यांच्या पिशव्या खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. जसे की दोन्ही पोते जमिनीवर पडले एका कर्कश वेगवान आवाजासह स्फोट झाला. याचा परिणाम एव्हढा जबरदस्त होता की, आसपासच्या सर्व दुकानांच्या काचा तुटल्या.

एवढेच नव्हे, घटनेच्या वेळी समोर असलेल्या एका दुकानाचे दरवाजे उखडले गेले. यादरम्यान यावेळीच तिथून जात असलेले चार व्यक्तीदेखील या स्फोटाच्या शिकार झाल्या.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्यानुसार स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह दिल्ली पोलिसांची स्पेशल तुकडी (सेल), दहशतवादविरोधी पथक, क्राइम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर पोहोचली.

(Pls Note
- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...