आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात शिळे जेवण दिले, एअर इंडियाला १ लाख दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फ्लाइटमध्ये शिळे जेवण दिल्यामुळे राष्ट्रीय ग्राहक आयोगाने एअर इंडियाला १ लाख रुपये दंड ठोठावला आहे. हा प्रकार मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये घडला होता.
राष्ट्रीय ग्राहक आयोगाने २०१५ मध्ये एअर इंडियाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ही पुनर्विचार याचिका होती. सेवेतील अशा प्रकारच्या बेफिकीरीमुळे अनेक प्रवाशांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे आयोगाने निर्णयात म्हटले आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने महाराष्ट्र राज्य आयोगाचा दंडाची रक्कम वाढवण्याचा आणि १० हजार रुपये खटल्याचा खर्च लावण्याचा निर्णयही उचित ठरवला. ग्राहक तक्रार निवारण मंचाने ठोठावलेला १५ हजार रुपये दंड वाढवून १ लाख रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य आयोगाने घेतला होता. मुंबईहून न्यूयॉर्कला जाताना एअरलाइन्सने शिळे जेवण दिले. भातामध्ये केसही आढळले, असे तक्रारदार मालती मधुकर पहाडे यांनी म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...