आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खलिस्तानी अतिरेक्याला दिल्लीत पकडले, पंजाबच्या नाभा तुरुंगावर हल्ल्यात नेले होते पळवून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/चंदिगड- पंजाबच्या नाभा तुरुंगातून पळालेला खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटूच्या निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर मुसक्या आवळल्या. मिंटूला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस आयुक्त अरविंद दीप यांनी दिली.

मिंटू पंजाबमधून निसटल्यानंतर तो दिल्लीत जाईल, अशी शक्यता पंजाब पोलिसांना होतो. याच आधारे त्यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे स्थानकावरील तपासणीत मिंटू पोलिसांच्या तावडीत सापडला. मिंटूला पंजाबमध्ये आणले जात आहे. तुरुंगफोडीनंतरची ही दुसरी अटक आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी सायंकाळी मास्टरमाइंड परमिंदर सिंगला अटक केली होती. त्याला शामली जिल्ह्यातील कैरानात पकडले.

रविवारी पोलिस गणवेशात आलेल्या शस्त्रधाऱ्यांनी नाभा तुरुंग फोडून मिंटूसह पाच कैद्यांची सुटका केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपींनाही अटक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. थायलंडने नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रत्यार्पण केल्यानंतर पंजाब पोलिसांनी मिंटूला अटक केली. दहशतवादाच्या १० प्रकरणांत तो पोलिसांना हवा होता. मिंटू व त्याचा प्रमुख हस्तक गुरुप्रीतसिंग ऊर्फ गोपीला केंद्रीय तपास संस्थांनी थायलंडमध्ये ट्रेस केले होते. रविवारच्या घटनेत कश्मिरासिंग हा आणखी एक अतिरेकी पळाला आहे.

2 खलिस्तानी दहशतवादी आणि 4 गँगस्टर्संची सूूटका
तुरुंंगात कैद असलेल्या 2 खलिस्तानी दहशतवादी आणि 4 गँगस्टर्संची सूूटका करण्यासाठी त्यांना हल्ला केला होता. 6 हल्लेखोर पोलिसांच्या वर्दीमध्ये होते. त्यांनी 100 फैरी झाडल्या. मात्र, तुरुंग रक्षकांनी एकही गोळी झाडली नाही. अवघ्या 13 मिनिटांत ही सुटका केली होती. यामुळे या हल्ल्यात तुरुंग प्रशासन सहभागी तर नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मास्टरमाइंड पम्मीला उत्तर प्रदेशात पकडले...
तुरुंग फोडण्याच्या घटनेचा मास्टरमाइंड परमिंदर सिंग ऊर्फ पम्मीला यूपीतील शामलीच्या कैरानात अटक करण्यात आली. त्याच्या फॉर्च्युनर कारमधून एक एके 47, 2 एसएलआर व मोठ्या संख्येत काडतुसे मिळाली. त्याच्या मागे येणाऱ्या दोन गाड्यांतील अन्य काही जण हरियाणाच्या दिशेने पळाले.

नीटा - गाैंडर गँगने व्हॉट्सअॅपवर रचला कट
भटिंडा पोलिसांनी पकडलेल्या गँगस्टरच्या फोन मधल्या माहितीत लक्ष घातले असते तर ही घटना टळली असती. हा कट विकी गौंडर व नीटा दियाेल यांनी रचला होता. तुरुंगात बसलेले गौंडर व नीटा हस्तकांशी व्हॉट्सअॅपवर सतत संपर्कात होते. 20 नोव्हेंबर रोजी पकडलेल्या गँगस्टरच्या फोनने कुलप्रीत व नीटासोबत व्हॉट्सअॅपवर चर्चा केली होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

रविवारी सकाळी पोलिसांच्या वेशातील हल्लेेखोरांनी केला तुरुंगावर हल्ला...
सकाळी फॉर्च्युनर कारसह दोन गाड्या तुरुंगासमोर उभ्या होत्या. तीन अन्य गाड्या गेटपासून जवळच होत्या. 8.30 वाजता एक कार मेन गेटवर आली. सर्व पोलिसांच्या वेशात असल्याने रक्षकाने गेट उघडले. आत पोहोचताच हल्लेखोरांनी बराकींच्या गेटवरील रक्षकाकडून चावी मागितली. नकार देताच धारदार शस्त्रांनी त्याला जखमी केले. चावी हिसकावून गोळीबार सुरू केला. आरडाओरड ऐकताच सहा कैदी गेटवर आले. गोळीबारामुळे घाबरलेले सुरक्षा रक्षक लपले. कोणीच प्रत्युत्तरादाखल कारवाई केली नाही. अारोपींनी फॉर्च्युनरमध्ये बसलेल्या चालकाला डिकी उघडण्यास सांगितले. त्यात शस्त्रसाठा होता. एका हल्लेखोराने रजईत लपेटलेली शस्त्रे कैद्यांनाही दिली. यानंतर सर्वांनी गोळीबार करत पळ काढला. दीड किमी अंतरावर रेल्वे फाटक बंद दिसल्यावर परत फिरून तुरुंगासमोरूनच पळाले.

बेजबाबदार : तीन मोठ्या संधी पोलिसांनी गमावल्या
- हल्लेखोरांनी 100 फैरी झाडल्या. पण एकालाही गाेळी लागली नाही. अर्ध्या तासापर्यंत त्यांना कुणी अडविलेही नाही.
- देखरेखीच्या टॉवरवर जवान तैनात होता. तो गोळीबार न करता लपून बसला.
- कैद्यांना सोडवल्यानंतर हल्लेखोर काही वेळ गेटवर थांबले. तेव्हाही कुणीच त्यांना पकडण्याचा प्रयत्न नाही केला.
- दीड किमीवरील रेल्वे फाटक बंद दिसताच हल्लेखोर यू टर्न घेऊन पुन्हा तुरुंगासमोरूनच गेले. तेव्हाही कुणी अडवले नाही.
- गोळीबाराची संधी साधून अन्य कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न का नाही केला?

पुढील स्लाइडवर वाचा... कोण आहे हरमिंदरसिंग मिंटू?, पळून गेलेल्या दहशतवाद्यांविषयीची माहिती...नाकाबंदीत कार थांबली नाही; पाेलिसांच्या गाेळीबारात नर्तकी ठार

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...