आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAPच्या विजयामागे होते 10 चेहरे आणि 10 कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभेत भाजप तीन जागांवर गुंडाळली गेली, तर काँग्रेस खाते देखील उघडू शकली नाही. पण अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला एवढा मोठा विजय कसा मिळाला? तर, त्याचे उत्तर आहे केजरीवाल यांचे नेतृत्व आणि त्याशिवाय पक्षाचे काही वलयांकित आणि पडद्यामागे राहून काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या जोरावर. 'आप'चे अनेक लोक गाजावाजा न करता काम करत होते. त्यात राघव चड्डा, अंकित लाल, आशीष तलवार, नागेंद्र शर्मा, दीपक वाजपेयी, दुर्गेश पाठक, दिलीप पांडे, आतिशी मरलेना, पंकज गुप्ता, गुल पनाग यांचा समावेश आहे. यांच्या मेहनतीशिवाय दहा कारणे अशी आहेत ज्यामुळे 'आप'ला 67 जागांवर विजय मिळाला.
1 - केजरीवालांची लोकप्रियता
केजरीवालांच्या पक्षाचे नाव आम आदमी पार्टी आहे, तर त्यांचे स्वतःचे राहाणीमान देखील सर्वसामान्य माणसाप्रमाणेच आहे. त्यांची ही शैलीच लोकांना पसंत पडली. विशेष म्हणजे समाजातील सर्व घटकांचे त्यांना समर्थन मिळाले. यात उच्चभ्रु आणि वैचारिक बैठक असलेल्या वर्गासोबतच युवकांचाही समावेश होता. अल्पसंख्याकाबरोबरच झोपडपट्टीतील समुदाय देखील त्यांच्यासोबत होता. गर्दीमध्ये केजरीवाल हे सर्वसामान्यांप्रमाणेच राहात होते. व्हिआयपी संस्कृतीला त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवले.
2 - भ्रष्टाचाराविरोधातील त्यांची कडक भूमिका
'आप'ने भ्रष्टाराविरोधात घेतलेली कडक भूमिका त्यांच्या फायद्याची ठरलेली आहे. पोलिसांची हप्ता वसूली, एमसीडीमधील भ्रष्टाचार असेल नाही, तर व्यापार्‍यांना सेल्स टॅक्स ऑफिसरकडून होणारा त्रास. 'आप'ने 49 दिवसांच्या सरकारमध्ये यावर सक्तीने कारवाई केली होती. त्यामुळेच भाजपचा व्यापारी वर्गातील मतदार आणि पारंपरिक व्होट बँक 'आप'कडे झुकली.
3 - मोदींच्या विजयाचे रेकॉर्ड मोडणे
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळत गेला होता. त्यामुळे भाजप आणि मोदींचा हा विजयरथ रोखणे कठीण आहे, असेच वाटत होते. मात्र, दिल्लीकरांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना वाटले की दैनंदिन कामांसाठी भाजप पेक्षा 'आप' अधिक योग्य पर्याय आहे. भाजपच्या काही नेत्यांच्या 'हेटस्पीच' आणि त्याला मोदींचा मौनातून पाठिंबा यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला. मोदी लोकांपासून दूर गेले. तर केजरीवाल लोकांमध्ये जाऊन मिसळत होते यामुळे ते अधिक जवळचे वाटू लागले. या फॅक्टरनी मोठे काम केले.
4 - बेदी कार्ड फेल
निवडणुकीच्या ऐन धामधुमीत भाजपने केजरीवालांविरोधात किरण बेदींना उतरवून मास्टर स्ट्रोक खेळला, पण तो फेल गेला. बेदी स्वतःची जागाही जिंकू शकल्या नाही. असेही बोलले जात की भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसला. पण केजरीवालांच्या मुकाबल्यात किरण बेदींची जादू चालली नाही. भाजपचे स्थानिक नेतृत्व 16 वर्षांपासून सत्तेची वाट पाहात होते. पक्षातील वरिष्ठांनी मात्र बेदींना मैदानात उतरवुन त्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. भाजपला हा डाव अत्यंत महागात पडला.
5 - प्रत्येक वर्गातून समर्थन
दिल्लीत झोपडपट्टीपासून हायक्लास सोसायटीत राहाणारा वर्ग आहे. उच्च मध्यम आणि मध्यमवर्गाचे आधीच 'आप'ला समर्थन होते. स्लम आणि लोअर मिडल क्लासनेही त्यांना मनापासून पाठिंबा दिल्याने हे घडले आहे. काँग्रेसची व्होट बँक समजला जाणारा दलित आणि अल्पसंख्याक ही यावेळी 'आप'कडे आकर्षीत झाला. 'आप'चे वीज आणि पाण्याचे आश्वासन फलदायी ठरले.

पुढील स्लाइडमध्ये, निवडणुकीला झालेला उशिर 'आप'च्या पथ्यावर