आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भोपाळमध्ये बुधवारी होणा-या भाजपच्या महामेळाव्यासाठी पक्षाने 10 हजार बुरख्यांची खरेदी केल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला. पत्रकारांना त्यांनी बुरखा खरेदी ऑर्डरची पावतीही दाखवली.
दिग्विजय म्हणाले, इंदूरमधून बुरखे खरेदीचे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. त्यांची किंमत 44 लाख रुपये आहे. यातील 42 लाख संबंधित दुकानदाराला देण्यात आलले आहेत. लखनऊतून काही टोप्याही खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याची पावतीही दाखवतो, असे सांगून बुरख्यांसाठी दिलीप बिल्डकॉनचे संचालक देवेंद्र जैन यांनी इंदूरच्या झीनत टेलर्सला 42 लाख दिल्याचे सिंह म्हणाले. दरम्यान, दाखवलेली पावती बनावट असल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.
टेलरकडून इन्कार : दिग्विजय यांच्या आरोपाचा झीनत टेलरच्या सूत्रांनी इन्कार केला आहे. दुकानातील दिनेश नामक कर्मचा-यांने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एक व्यक्ती दुकानात आली. तिने 10 हजार बुरख्यांची ऑर्डर मिळाल्याचे सांगून त्याचे किती बिल होईल, अशी विचारणा केली. अधिकृत बिल न देता टेलरकडून एक कोटेशन भरून देण्यात आले. दिनेशच्या दाव्यानुसार, आजपर्यंत या दुकानातून कधीही एकदम 10 हजार बुरखे शिवून दिलेले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.