आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक जिल्ह्यात 10 हजार लोक होतील ‘डिजिटल भैया’, प्रशिक्षण देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आधार पे सिस्टीमबाबत प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आणि युवकांना शिक्षित करणार आहे. या खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद ‘डिजिटल भैया’ नावाच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतील. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात २ ते १० हजारपर्यंत युवकांना प्रशिक्षित केले जाईल.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, आधार पेसाठी मोबाइल, क्रेडिट-डेबिट कार्डची गरज नाही. ती ई-पेमेंटचा सर्वात सुरक्षित आणि सरळ पद्धत आहे. भीम अॅप घरोघर पोहोचावे, असे मंत्रालयाला वाटते. त्यासाठी मंत्रालयाचे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग लोकांना प्रशिक्षित करेल. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटचा वेग वाढला आहे. सरकारने भीम अॅपही लाँच केले आहे. त्याद्वारे कोणीही मोबाइलने पेमेंट करू शकते.
बातम्या आणखी आहेत...