आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर बसमध्‍ये बलात्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये गेल्‍या वर्षी धावत्‍या बसमध्‍ये विद्यार्थिनीवर झालेल्‍या बलात्‍काराच्‍या घटनेनंतर पुन्हा एकदा खासगी बसमध्ये एका 10 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. चालकाने बस स्‍वतःच्‍या घरी आणली होती. खासगी बसेस मालकाच्‍या घराजवळच उभ्‍या करण्‍याचे निर्देश दिल्‍ली बलात्‍कार प्रकरणानंतर पोलिसांनी दिले होते. परंतु, त्‍याचे पालन झाले नाही.

प्राप्‍त माहितीनुसार, शहरातील सुलतानपुरी भागात ही घटना घडली. आरोपी बसचालक राकेश कौशल (45) याने बस घराजवळच उभी केली होती. पीडित मुलगी एका शासकीय शाळेत शिकते. सायंकाळी खेळत असतना ती बसजवळ पोहोचली. त्‍यावेळी बसचालकाने तिला आमिष दाखवून बसमध्‍ये नेले आणि बलात्‍कार केला. त्‍यानंतर तिला धमकी देऊन सोडून दिले. मुलीने घरी हा प्रकार सांगितल्‍यानंतर पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली. तिची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली असून त्‍यात बलात्‍कार झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिल्लीमध्ये गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार आणि मारहाण करण्यात आली होती. यानंतर तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती.